मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोन्याचे दर 47 हजारांवर; पुन्हा महाग झालं Gold

Gold Price Today: सोन्याचे दर 47 हजारांवर; पुन्हा महाग झालं Gold

Gold Rates Today

Gold Rates Today

Gold Silver Price : पाहा काय आहेत आजचे सोन्याचांदीचे भाव (Gold Silver rate)

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : भारतीय सराफा बाजारात काल घसरलेले सोन्याचे दर आज पुन्हा वधारले आहेत. आज 4 ऑगस्ट, 2021 रोजी सोन्याची किंमत (Gold Price Today) वाढली आहे. त्यामुळे आज सोन्याचे दर 47 हजारांवरगेले आहेत. तर चांदीचे दर (Silver Price Today) देखील वाढले आहेत.

आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46,869 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर प्रति किलो 66,160 रुपये इतके होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही.

सोन्याचे नवे दर (Gold Price Today on 03rd August 2021)

दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर प्रति तोळा 123 रुपयांनी वाढलेले आहेत. यानंतर सोन्याचे दर 47 हजार रुपयांच्या जवळपास गेले आहेत. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,992  रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.

हे वाचा - रक्षाबंधनाच्या आधी सुरु करा हा व्यवसाय; एका दिवसात होईल1लाखाची कमाई!

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,815 डॉलर प्रति औंसवर आहेत.

चांदीचे नवे दर (Silver Price Today on 03rd August 2021)

सोन्यासह आज चांदी दरातही वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर 766 रुपयांनी वाढले आहेत. यानंतर चांदीचे दर  66,926 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. त्यामुळे चांदीचे दर 25.71 डॉलर प्रति औंसवर आहेत.

का वाढलेत सोन्याचे दर?

एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घटल्याने भारतीय बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत.

हे वाचा - SIP मध्ये गुंतवणूक करताना या 5 चुका टाळाच, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

शिवाय न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे वाढल्यामुळेही दिल्लीतील सराफा बाजारातही सोन्याचे दर वाढले आहेत.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Money