Gold Price: चार महिन्यात सोने दरात 7 हजारहून अधिक घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Gold Price: चार महिन्यात सोने दरात 7 हजारहून अधिक घसरण; जाणून घ्या आजचा भाव

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमती कमी झाल्याने देशांतर्गत बाजारातही किंमती घसरल्या आहेत. याशिवाय कोरोना व्हायरस वॅक्सीनबाबत आलेल्या सकारात्मक बातम्यांमुळे सोन्याच्या किंमतीवरील दबाव वाढत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : मागील आठवड्यात सोने दरात (Gold rate today) 52 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर 49,172 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीच्या दरात एमसीएक्सवर 78 रुपयांची प्रति किलो किरकोळ घसरण झाली. त्यामुळे चांदीचा दर (Silver rate today) 63,813 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.

सोन्याच्या किंमती मागील उच्चांकी स्तरावरून मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत. सध्या किंमतीनुसार तुलना केल्यास, उच्चांकी स्तरावरून सोन्यात 7776 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव उच्चांकी स्तरावरून 15,412 रुपयांनी घसरला आहे.

(वाचा - खूशखबर! डिसेंबरपर्यंत EPF वर मिळेल 8.50 टक्के व्याज; 6 कोटी लोकांना होणार फायदा)

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमती कमी झाल्याने देशांतर्गत बाजारातही किंमती घसरल्या आहेत. याशिवाय कोरोना व्हायरस वॅक्सीनबाबत (Coronavirus Vaccine) आलेल्या सकारात्मक बातम्यांमुळे सोन्याच्या किंमतीवरील दबाव वाढत आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती आणखी घसरू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाल्यामुळेही सोन्याच्या किंमतीमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

(वाचा - रिटायर्ड अधिकाऱ्याच्या खात्यातून 40 लाखांची चोरी; थेट पंतप्रधानांकडे केली तक्रार)

OANDA चे सीनियर मार्केट एनालिस्ट एडवर्ड यांनी सांगितलं की, कोरोना वॅक्सिनची बातमी अतिशय मोठी आहे. याचा जगभरातील मार्केटवर परिणाम पाहायला मिळतो आहे. अशात आता सेफ-सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची केली जाणारी खरेदी थांबू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी घसरण पाहायला मिळू शकते.

Published by: Karishma Bhurke
First published: December 13, 2020, 4:00 PM IST

ताज्या बातम्या