Home /News /money /

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात आज वाढ, काय आहेत नवे दर?

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात आज वाढ, काय आहेत नवे दर?

सोन्याचा भाव (Gold Price Today) 34 रुपयांनी वाढून 47,918 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 47,884 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

    मुंबई, 4 फेब्रुवारी : सोने आणि चांदी (Gold Silver rate) दोन्हीच्या दरात आज वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव (Gold Price Today) 34 रुपयांनी वाढून 47,918 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 47,884 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. सोन्याच्या दराबाबत माहिती देताना एचडीएफसी सिक्युरिटीजने सांगितले की, आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सोन्याच्या दरात ही वाढ दिसून आली आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात (Silver Price Today) 330 रुपयांची वाढ झाली. चांदी 61,006 रुपये प्रति किलोवर बंद झाली. गेल्या ट्रेडिंग सत्रात चांदीचे दर 60,676 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,810 डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव 22.55 डॉलर प्रति औंस होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटलं की, न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्सवर शुक्रवारी स्पॉट सोन्याचा भाव 1810 डॉलर प्रति औंस झाला. Tata Group च्या 'या' शेअरला ब्रोकरेज फर्मची BUY रेटिंग, Rakesh Jhunjhunwala यांनीही स्टेक वाढवले कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून 'या' बँकेचा परवाना रद्द, खातेधारकांवर काय परिणाम होणार? चेक करा घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर  सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Investment, Money

    पुढील बातम्या