नवी दिल्ली, 10 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे भारतातही या मौल्यवान धातूंच्या किंमती उतरल्या आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात खरेदीदारांसमोर सोनं खरेदी करण्याची संधी आहे. देशांतर्गत बाजारात गुरुवारी देखील सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. गुरुवारी 10 डिसेंबर 2020 रोजी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) 534 रुपये प्रति तोळांंनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दरही आज उतरले आहेत. एक किलो चांदीच्या दरात (Silver Price Today) 628 रुपयांची घसरण झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 49,186 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीचे दर 63,339 रुपये प्रति किलो होते. जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीच्या दरात घसरण झाल्याने भारतात सोन्याचांदीचे दर कमी झाले आहेत.
सोन्याचे नवे भाव (Gold Price on 10th December 2020)
दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 534 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर 48,652 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 49,186 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,835 डॉलर प्रति औंस झाले आहेत.
(हे वाचा-12 डिसेंबरपासून बदलणार Post Office हा नियम, उद्याच पूर्ण करा हे काम अन्यथा...)
चांदीचे नवे भाव (Silver Price on 10th December 2020)
सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीमध्ये देखील आज घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी चांदीच्या दरात 628 रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर चांदीचे भाव प्रति किलो 62,711 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर (International Market) चांदीचे दर 23.84 डॉलर प्रति औंस आहेत.
(हे वाचा-एप्रिल 2019 पासून घटणार तुमच्या हातात येणारा पगार, काय आहे फायदा आणि नुकसान?)
का कमी झाले सोन्याचांदीचे भाव
एचडीएफसी सिक्योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल (Tapan Patel) यांच्या मते आज सलग चौथ्या दिवशी डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयामध्ये (Rupee) घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमती कमी झाल्याने देशांतर्गत बाजारातही किंमती उतरल्या आहेत. याशिवाय कोरोना व्हॅक्सिनबाबत सकारात्मक बातम्या समोर आल्याने सोन्याच्या किंमतीवरील दबाव वाढत आहे. त्यांनी असे म्हटले की अमेरिकेत स्टिम्यूलस पॅकेजची घोषणा झाली आणि डॉलरचे मुल्य कमी झाले तर सोन्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे.