मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: 46000 च्या जवळपास पोहोचलं सोनं, आजच्या घसरणीनंतर हे आहेत लेटेस्ट भाव

Gold Price Today: 46000 च्या जवळपास पोहोचलं सोनं, आजच्या घसरणीनंतर हे आहेत लेटेस्ट भाव

Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today

Gold Silver Price, 22 July 2021: सोन्याच्या दरात गुरुवारी घसरण पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरात आज किरकोळ वाढ झाली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 22 जुलै: दिल्लीतील सराफा बाजारात आज 22 जुलै रोजी सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. या घरसणीनंर सोन्याचे दर 46,000 रुपये प्रति तोळाच्या स्तरावर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरात (Silver Price Today) आज किरकोळ तेजी पाहायला मिळाली. आधीच्या सत्रात सोन्याचे दर (Gold Rates) दिल्लीतील सराफा बाजारात 46,716 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 65,480 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर उतरले आहेत, तर चांदीच्या दरात (Silver Rates) विशेष बदल झालेला नाही.

सोन्याचे नवे दर (Gold Rates on 22nd July 2021)

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 264 रुपयांनी कमी झाले आहेत. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,452 रुपये प्रति तोळा आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Rates in International Market) 1,797 डॉलर प्रति औंस आहेत.

हे वाचा-PM kisan: 27 लाख शेतकऱ्यांचं ट्रान्झॅक्शन फेल, या चुकांमुळे अडकतील तुमचेही पैसे

चांदीचे नवे दर (Silver Rates on 22nd July 2021) 

चांदीच्या किंमतीमध्ये आज तेजी पाहायला मिळाली आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी चांदीचे दर किरकोळ अर्थात 4 रुपयांनी वधारले आहेत. यानंतर चांदीचे दर 65,484 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही.

हे वाचा-चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केली रक्कम? परत मिळवण्यासाठी काय आहे SBI चा सल्ला

का वाढले सोन्याचे दर?

एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे आणि अमेरिकन बाँड यील्डमध्ये झालेल्या वाढीमुळे सोन्याचे दर उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर उतरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या दरावर देखील झाला आहे.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today