मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: काही दिवसांच्या घसरणीनंतर सोने दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: काही दिवसांच्या घसरणीनंतर सोने दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

आज आठवड्याच्या सुरुवातीला सोने दरात (Gold price today)  काहीशा वाढीची नोंद झाली आहे.

आज आठवड्याच्या सुरुवातीला सोने दरात (Gold price today) काहीशा वाढीची नोंद झाली आहे.

आज आठवड्याच्या सुरुवातीला सोने दरात (Gold price today) काहीशा वाढीची नोंद झाली आहे.

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : आज आठवड्याच्या सुरुवातीला सोने दरात (Gold price today)  काहीशा वाढीची नोंद झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi commodity exchange) सोने दरात 0.12 टक्के म्हणजेच 58 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅमसाठीचा दर 47216 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर MCX वर चांदी 0.4 टक्के वाढीसह 61951 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात काहीशी घसरण झाली आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर -

मागील एका आठवड्यापासून सोन्याच्या दरात जवळपास 950 रुपयांची घसरण झाली होती. आता पुन्हा एकदा दरात काशीही वाढ झाली आहे. गुड्सरिटर्न वेबसाईटनुसार, आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा भाव 50480 रुपये आहे. चेन्नईत 48690 रुपये, मुंबईत 47190 रुपये आणि कोलकातामध्ये 49180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या डेल्टा वेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांमुळे आर्थिक बाबींवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. डेल्टा वेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांबाबत व्यापारी आणि गुंतवणुकदारांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण आहे. जागतिक बाजारात रुपयांत होणाऱ्या चढ-उताराचा परिणाम सोन्याचा किमतीवरही होऊ शकतो.

Alert! तुम्हाला PAN Cardसंबंधी असा मेसेज आला का?वेळीच व्हा सावध,अन्यथा बसेल फटका

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

ATM Cash Withdrawal Rules: ATM मध्ये पैसे नसल्यास इथे करा तक्रार

अशी तपासा सोन्याची शुद्धता -

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.

First published:
top videos

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today