मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, पाहा आजचा लेटेस्ट भाव

Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, पाहा आजचा लेटेस्ट भाव

भारतीय सराफा बाजारात आज 7 जून 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) काहीशी घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही (Silver Price Today घसरण झाली आहे.

भारतीय सराफा बाजारात आज 7 जून 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) काहीशी घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही (Silver Price Today घसरण झाली आहे.

भारतीय सराफा बाजारात आज 7 जून 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) काहीशी घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही (Silver Price Today घसरण झाली आहे.

नवी दिल्ली, 7 जून : आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीमुळे भारतीय सराफा बाजारात आज 7 जून 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) काहीशी घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही (Silver Price Today घसरण झाली आहे. चांदीचा भाव 70000 रुपये प्रति किलोग्रॅमहून कमी झाला आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 48,259 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर चांदी 70,465 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा दर काहीसा कमी झाला, तर चांदीचा दर स्थिर होता.

सोन्याचा नवा भाव (Gold Price, 7 June 2021) -

दिल्ली सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याचा भाव 152 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. त्यामुळे 48000 रुपये प्रति 10 ग्रॅमजवळ पोहोचला आहे. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव आता 48,107 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात सोनं 48,259 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.

(वाचा - जगभरात या Emoji ला सर्वाधिक पसंती, तुम्हीही हा इमोजी वापरता का?)

चांदीचा नवा दर (Silver Price, 7 June 2021) -

चांदीचा दरही आज काहीसा कमी झाला आहे. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 540 रुपयांनी कमी झाला आहे. दिल्ली सराफा बाजारात आज चांदीचा दर 69,925 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. या आधीच्या सत्रात चांदीचा भाव 70,465 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

(वाचा - तुमच्या फायद्याची बातमी, Online Transaction करताना या गोष्टींकडे लक्ष द्या)

सोने-चांदी दरात घसरण का?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कच्या कमॉडिटी एक्सचेंज कॉमेक्सवर सोने दरात घसरण झाली. तसंच इतर चलनाच्या तुलनेत डॉलरमध्ये मजबूती आल्याचा परिणामही सोन्यावर पाहायला मिळाला.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today