• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: पुन्हा उतरले सोन्याचे दर, चांदीच्या किंमतीत 372 रुपयांची घसरण

Gold Price Today: पुन्हा उतरले सोन्याचे दर, चांदीच्या किंमतीत 372 रुपयांची घसरण

भारतीय सराफा बाजारात आज 3 ऑगस्ट रोजी सोन्याची किंमत (Gold Price Today) उतरली आहे. त्यामुळे आजही सोन्याचे दर 47 हजार रुपये प्रति तोळापेक्षा कमी आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 03 ऑगस्ट: भारतीय सराफा बाजारात आज 3 ऑगस्ट रोजी सोन्याची किंमत (Gold Price Today) उतरली आहे. त्यामुळे आजही सोन्याचे दर 47 हजार रुपये प्रति तोळापेक्षा कमी आहेत. तर चांदीचे दर (Silver Price Today) देखील आज कमी झाले आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46,922 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर प्रति किलो 66,444 रुपये इतके होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. सोन्याचे नवे दर (Gold Price Today on 03rd August 2021) दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर प्रति तोळा 31 रुपयांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर सोन्याचे दर 47 हजार रुपयांपेक्षा कमी आहेत. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,891 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,810 डॉलर प्रति औंसवर आहेत. हे वाचा-नाशिकमधील बँकेसह 2 बँकांवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला 50 लाखांपेक्षा जास्त दंड चांदीचे नवे दर (Silver Price Today on 03rd August 2021) सोन्यासह आज चांदीचे दर देखील कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर 372 रुपयांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर चांदीचे दर  66,072 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. त्यामुळे चांदीचे दर 25.34 डॉलर प्रति औंसवर आहेत. या दरम्यान आज रुपयाचे मुल्य आज डॉलरच्या तुलनेत 4 पैशांनी मजबुत झाले आहे. का उतरले सोन्याचे भाव? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. शिवाय न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर घसल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारातही सोन्याचे दर कमी झाले आहे,
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: