मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण, वाचा काय आहे आजचा भाव

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण, वाचा काय आहे आजचा भाव

Gold Price Today: मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 09:15 वाजता सोन्याचे दर 0.32 टक्क्यांनी घसरले आहेत. यानंतर सोन्याचे दर 47,933 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.

Gold Price Today: मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 09:15 वाजता सोन्याचे दर 0.32 टक्क्यांनी घसरले आहेत. यानंतर सोन्याचे दर 47,933 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.

Gold Price Today: मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 09:15 वाजता सोन्याचे दर 0.32 टक्क्यांनी घसरले आहेत. यानंतर सोन्याचे दर 47,933 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.

नवी दिल्ली, 03 ऑगस्ट: आठवड्यातील दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात (Gold price today) घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange)  सकाळी 09:15 वाजता सोन्याचे दर 0.32 टक्क्यांनी घसरले आहेत. यानंतर सोन्याचे दर 47,933 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दरही  (Silver price today) मंगळवारी उतरले आहेत. 3 ऑगस्ट रोजी चांदी 0.53 टक्क्यांनी कमी होऊन दर 67,528 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. असे असले तरीही रेकॉर्ड लेव्हलपेक्षा सोन्याचे दर 8,200 रुपयांनी कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर जवळपास 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर (Gold Rates on Record High) पोहोचले होते.

GoldPrice.org मते आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय वेळेनुसार सकाळी 8.32 वाजता एमसीएक्सवर सोन्यामध्ये 0.017 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीनंतर सोन्याचे दर 1810.70 डॉलर प्रति औंसवर आहेत. तर चांदीमध्ये 0.85 टक्क्क्यांची घसरण झाली आहे, यानंतर चांदी 25.29 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर आहे.

हे वाचा-दररोज केवळ 2 रुपये जमा करुन मिळवता येईल 36 हजार रुपये पेन्शन, पाहा काय आहे योजना

22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव

गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते मुख्य शहरांमध्ये 22 सोन्याचा दर 47,150 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 51,430 रुपये प्रति तोळा आहे. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,380 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर  48,380 रुपये आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,400 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,100 रुपये आहे. चेन्नईमध्ये दर 45,350 (22 कॅरेट) आणि 49,490 रुपये (24 कॅरेट) प्रति तोळा आहे

EMI वर खरेदी करा स्वस्त सोनं

EMI वर सोनंखरेदीचा पर्याय उत्तम ठरू शकतो. तुम्हाला एखादा दागिना आवडला असेल पण पैसे कमी पडत असतील तर AUGMONT तुम्हाला EMI वर दागिने खरेदी करण्याचा पर्याय देत आहे. Augmont तुम्हाला EMI वर दागिने खरेदी करण्याचा पर्याय देत आहे.

हे वाचा-सामान्यांच्या खिशाला चाप! दुपटीनं महागलं खाद्यतेल, काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

याकरता तुम्हाला सुरुवातीला 20% डाउन पेमेंट करावे लागेल. 20 टक्के पेमेंटनंतर तुमचा EMI किती होईल ते निश्चित केले जाईल. कॉस्ट ईएमआय पेमेंटच्या 10 दिवसात डिलिव्हरी केली जाईल. कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी अशाप्रकारे EMI वर दागिने खरेदी करणं एक चांगला पर्याय ठरू शकतो. याकरता ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today