मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, पाहा काय आहे लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, पाहा काय आहे लेटेस्ट रेट

मागील काही दिवसांच्या वाढीनंतर आज भारतीय बाजारात सोनं आणि चांदीच्या (gold silver price) किमतीत घसरण झाली आहे.

मागील काही दिवसांच्या वाढीनंतर आज भारतीय बाजारात सोनं आणि चांदीच्या (gold silver price) किमतीत घसरण झाली आहे.

मागील काही दिवसांच्या वाढीनंतर आज भारतीय बाजारात सोनं आणि चांदीच्या (gold silver price) किमतीत घसरण झाली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : मागील काही दिवसांच्या वाढीनंतर आज भारतीय बाजारात सोनं आणि चांदीच्या (gold silver price) किमतीत घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने वायदे भाव चार दिवसांच्या तेजीनंतर 0.55 टक्क्यांनी घसरला असून 47,360 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदी वायदे भाव 0.7 टक्के घसरला असून 63,051 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे आज सोने दरात घसरण झाली आहे.

भारतीय बाजारातील सोने-चांदी दर आणि बुलियन इंडेक्स फ्यूचर्स विदेशी किमती पाहता मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. MCX वर ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. सोने दर 47,450 ते 47,300 हजारपर्यंत असेल. तर सप्टेंबरमध्ये चांदी 62500 रुपयांवर 63,200 ते 63,900 पर्यंत असेल.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सॅलरी स्लिपकडे कधीही करू नका दुर्लक्ष; या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मिळते माहिती

अशी तपासा सोन्याची शुद्धता -

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today