मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: 46 हजारांपेक्षा कमी झाले सोन्याचे भाव, दोन महिन्यातील निचांकी स्तरावर दर

Gold Price Today: 46 हजारांपेक्षा कमी झाले सोन्याचे भाव, दोन महिन्यातील निचांकी स्तरावर दर

Gold Silver Price, 30 June 2021: सोन्याचांदीच्या दरात बुधवारी घसरण पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते डॉलरमध्ये (Dollar) मजबुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे दिल्लीमध्ये दर उतरले आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 2 महिन्याच्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 30 जून: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आलेल्या कमजोरीमुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर कमी झाले आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी 30 जून 2021 रोजी सोन्याचे दर  (Gold Price Today) कमी झाले आहेत. तर चांदीचे दर देखील (Silver Price Today) आज घसरले आहेत. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46,047 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते तर चांदीचे दर 67,532 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दरात देखील मोठी घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात विशेष बदल झाले नाही आहेत.

सोन्याचे आजचे दर (Gold Price, 30 June 2021)

दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 264 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. दिल्लीमध्ये 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर या घसरणीनंतर 45,783 रुपये प्रति तोळा झाले आहेत. सोन्याचे आजचे दर गेल्या दोन महिन्यातील निचांकी स्तरावर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आज घसरून 1,755 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.

हे वाचा-कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! सप्टेंबरमध्ये मिळणार वाढलेला पगार

चांदीचे आजचे दर (Silver Price, 30 June 2021)

चांदीच्या दरातही आज घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी चांदीचे दर किरकोळ 60 रुपयांनी उतरले आहेत. या घसरणीनंतर चांदीचे दर 67,472 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात जास्त बदल झालेले नाहीत आणि दर 25.80 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.

हे वाचा-उद्यापासून बदलणार बँकिंग, टॅक्ससंदर्भातील हे नियम; जाणून घ्या काय आहेत हे बदल

का उतरले सोन्याचे दर?

एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities)चे सीनिअर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते सोन्याचे दर आज गेल्या दोन महिन्यातील निचांकी पातळीवर आहेत. डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे सोन्यामध्ये व्यवहार कमी झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्चचे व्हीपी नवनीत दमानी यांच्या मते गेल्या काही सत्रांपासून डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे सोन्याच्या दर 1700 डॉलर प्रति औंसकडे वाटचाल करत आहेत.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today