मुंबई, 21 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर (Gold Price) सातत्याने घटत आहे. सोन्याची किंमत लक्षणीयरित्या कमी झाली आहे. गेल्या 8 महिन्यांत सर्वाधिक कमी दरावर सोनं पोहोचलं आहे. आतापर्यंत सोनं तब्बल 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याची किमतीत घसरण सुरूच आहे. त्यामुळे आताच सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ आहे का? पुढील काही दिवसांत सोनं आणखी स्वस्त होईल का? की पुन्हा महाग होईल? असाच विचार तुम्हीही करत असाल. तर याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात ते पाहा.
या आठवड्यात शुक्रवारी 1,200 रुपयांनी घटून सोनं प्रति तोळा 46,130 रुपयांवर पोहोचलं आहे. 2020 सालात सर्वाधिक वाढीनंतर या वर्षात सोन्याची किंमत सर्वात दास्त कमी झाली आहे. 8 महिन्यांत सोन्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षाही जास्त किमतीनं कमी झाली आहे. याआधी ऑगस्टमध्ये सोनं तब्बल 56 हजार 200 रुपयांवर पोहोचलं होतं. ऑगस्टनंतर सोनं आता स्वस्त झालं आहे.
हे वाचा - इलेक्ट्रिक चारचाकी वाहन खरेदीवर सरकार देणार दीड लाखांचं अनुदान; रोड टॅक्सही माफ
मुंबईतील एका डिलरनं सांगितलं, ज्वेलर्स सण आणि लग्नाच्या सिझनमध्ये इन्वेंट्री बनवण्यासाठी इच्छुक आहेत. जागतिक बाजारपेठेत अमेरिकी बाँड यील्ड (US bond yields) वाढल्यानं या आठवड्यात सोन्याची दर झपाट्याने कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,791 डॉलर प्रति औंस झालं आहे. Global futures price comex वर सोनं 1,784 डॉलर प्रति औंस आहे. आता सोनं 1800 डॉलर प्रति औंसच्याही खाली आलं आहे.
हे वाचा - सामान्यांच्या खिशाला इंधनवाढीमुळे चाप, परभणीमध्ये पेट्रोलने केली शंभरी पार
तज्ज्ञांच्या मते, सोनं-चांदी खरेदी करायची असेल तर हीच योग्य वेळ आहे. सोन्याची किंमत घटल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी होईल. कारण घटलेल्या किमती ग्राहकांना आकर्षित करत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये यावर्षी सोनं 10 हजार रुपये सिवस्त झालं आहे. कोरोना संकटात सोनं 55 हजार रुपयांवर पोहोचलं होतं. कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच आहे. लसीकरण झाल्यानंतर आर्थिक गतीविधींना वेग येईल, ज्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होईल.