Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, वाचा काय आहे बुधवारची किंमत

Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, वाचा काय आहे बुधवारची किंमत

Gold Silver Price, 18 November 2020: देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे आज चांदीचे भाव देखील 532 रुपये प्रति किलोने उतरले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: भारतीय बाजारांमध्ये बुधवारी सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या किंमती कमी झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर बुधवारी (Gold Price Today) प्रति तोळा 357 रुपयांनी कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे आज चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे.  चांदीचे भाव बुधवारी  (Silver Price Today) 532 रुपये प्रति किलोने उतरले आहेत. याआधी मंगळवारी सराफा बाजारात सोन्याचे दर 50,610 रुपये प्रति तोळा होते, तर चांदीचे दर 63,171 रुपये प्रति किलो होते.

सोन्याचे नवे दर (Gold Price, 18 November 2020)

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 357 रुपयांनी कमी झाले आहेत. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर  50,253 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे ट्रेडिंग 50,610 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून 1,882 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

चांदीचे नवे दर (Silver Price, 18 November 2020)

सोन्याबरोबरच आज चांदीचे भाव देखील उतरले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी चांदीचे दर 532 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. यानंतर चांदी 62,639 रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 24.57 डॉलर प्रति औंस वर पोहोचले आहेत.

(हे वाचा-सबसिडी नसणाऱ्या LPG गॅस सिलेंडरवर मिळवा सवलत, अशाप्रकारे करा बुकिंग)

का कमी झाल्या सोन्याचांदीच्या किंमती?

एचडीएफसी सिक्‍योरिटी के सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल (Tapan Patel) यांच्या ममते डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचे मुल्य 32 पैशाने मजबूत झाले आहे. याचा परिणाम दोन्ही मौल्यवान धातूंचे मुल्य उतरले आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्‍ट्रीय बाजारातील सोन्याच्या किंमतींचा परिणाम देखील भारतीय बाजारातील सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. याशिवाय कोव्हिड-19 लशीसंदर्भात सकारात्मक बातमी समोर आल्याने देखील त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 18, 2020, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading