Home /News /money /

Gold Rate Today: सोनं खरेदीची संधी, सलग चौथ्या दिवशी दरात घसरण; काय आहेत नवे दर?

Gold Rate Today: सोनं खरेदीची संधी, सलग चौथ्या दिवशी दरात घसरण; काय आहेत नवे दर?

मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिल्लीत आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 437 रुपयांनी घसरून 51,151 रुपयांवर आला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 51,588 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

    मुंबई, 29 मार्च : सोने खरेदीसाठी सध्या मोठी सुवर्णसंधी आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून वाढ असलेल्या सोन्याच्या किमतीत आता सातत्याने घट होताना दिसत आहे. मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिल्लीत आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 437 रुपयांनी घसरून 51,151 रुपयांवर आला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 51,588 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदीच्या दरातही घसरण चांदीचा भाव आज 722 रुपयांनी घसरून 67,515 रुपये प्रति किलो झाला आहे. जागतिक बाजारात सोन्या-चांदीची घसरण आणि रुपयात झालेली वाढ हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मंगळवारी रुपया 36 पैशांनी वधारला असून डॉलरच्या तुलनेत तो 75.80 वर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, आज COMEX वर स्पॉट सोन्याचा भाव 1,918 डॉलर प्रति औंस 0.25 टक्क्यांनी खाली व्यापार करत आहे, तर चांदी 24.80 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. बँक घोटाळ्यात रोज 100 कोटींचं नुकसान, महाराष्ट्रात सर्वाधिक घोटाळे; RBI रिपोर्ट्समधून माहिती उघड सोन्याची शुद्धता कशी तपासाल? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. Multibagger Stock: TATA समूहाच्या या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल; वर्षभरात 235 टक्के रिटर्न्स घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर  सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Money

    पुढील बातम्या