मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: सोन्याचे दर 269 रुपये तर चांदी 630 रुपयांनी वधारली, तपासा लेटेस्ट भाव

Gold Price Today: सोन्याचे दर 269 रुपये तर चांदी 630 रुपयांनी वधारली, तपासा लेटेस्ट भाव

Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today

Gold Silver Price, 5 October 2021: सोन्याच्या किंमतीत मंगळवारी विशेष तेजी पाहायला मिळाली आहे. तर चांदीचे दर देखील आज वधारले आहेत. तज्ज्ञांच्या मते डॉलरच्या तुलनेत आज रुपयामध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाल्याने सोन्याचे दर वाढले आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर: भाररतीय सराफा बाजारात आज मंगळवारी 05 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) वाढले आहेत. आजच्या वाढीनंतरही सोन्याचे दर प्रति तोळा 46 हजार रुपयांपेक्षा कमीच आहेत. आज चांदीच्या किंमतीतही (Silver Price Today) उसळी पाहायला मिळाली आहे. आजच्या वाढीनंतर चांदीचे दरही 59 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त झाले आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 45,497 रुपये होते. तर चांदीचे दर 59,074 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. दरम्यान भारतीय बाजारांच्या उलट परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात (Gold Price Today in International Market) पाहायला मिळाली. याठिकाणी आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही आहे.

सोन्याचे आजचे दर (Gold Rate Today on 05th October 2021)

आज मंगळवारी सोन्याचा भाव 269 रुपये प्रति तोळाने वाढला आहे. या वाढीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर दिल्लीतील सराफा बाजारात 45,766 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर 1,759 डॉलर प्रति औंसवर आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.

हे वाचा-बँक एफडीपेक्षाही चांगला रिटर्न देईल पोस्ट ऑफिसची ही स्कीम, वाचा सविस्तर

चांदीचे आजचे दर (Silver Rate Today on 05th October 2021)

चांदीच्या किंमतीत देखील आज मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीचे दर 630 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. यामुळे चांदी आज 59,704 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल न झाल्याने दर 22.58 डॉलर प्रति औंसवर आहेत.

हे वाचा-ऑक्टोबरमध्ये बंपर कमाईची संधी! Policy Baazar-Nykaa सह 12 कंपन्यांचे येणार IPO

का वाढले सोन्याचांदीचे दर?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य 32 पैशांनी कमी झाले आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये आज रुपया 74.63 च्या खालच्या स्तरावर उघडला होत. यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात बदल पाहायला मिळाला आहे.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today