मुंबई, 29 नोव्हेंबर : दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price today) वाढ होताना दिसत आहे. मात्र सातत्याने वाढ होत असतानाही सोनं विक्रमी उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त मिळत आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही खरेदी करायची असेल तर लवकर करा. आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारी डिलिव्हरीसाठीच्या सोन्याच्या किमतीत 0.34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी चांदीच्या दरात 0.96 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विक्रमी उच्चांकापेक्षा 8077 रुपये स्वस्त
गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 48,123 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8077 रुपयांनी स्वस्त होत आहे.
काय आहे सोन्या-चांदीचा भाव? (Gold Silver Price)
ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.34 टक्क्यांनी वाढून 48,123 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी आजच्या व्यवहारात चांदीच्या दरात 0.96 टक्क्यांनी वाढ झाली. आज 1 किलो चांदीचा भाव 63,571 रुपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यातील फरक काय? 22 Karat सोन्याला का म्हणतात 916 Gold
सोन्याचा नवा भाव कसा पाहायचा?
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
या मराठी तरुणाला मोदी सरकारकडून मिळाले 90 लाख! PM Modi यांनी केलं कौतुक
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.