मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: 2 आठवड्यात 2000 रुपयांनी उतरलं सोनं, खरेदीआधी इथे तपासा आजचा भाव

Gold Price Today: 2 आठवड्यात 2000 रुपयांनी उतरलं सोनं, खरेदीआधी इथे तपासा आजचा भाव

गेल्या काही दिवसांपासून सोनंचांदीच्या किंमतीत (Gold and Silver Price Today) मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. दरम्यान शुक्रवारी 13 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) वाढ झाली आहे. दोन आठवड्यांमध्ये सोन्याचे दर साधारण 2000 रुपयांनी कमी झाले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट: गेल्या काही दिवसांपासून सोनंचांदीच्या किंमतीत (Gold and Silver Price Today) मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. दरम्यान शुक्रवारी 13 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi-Commodity Exchange MCX) ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 0.19 टक्क्यांनी झालेल्या या वाढीमुळे दर 46,449 रुपये प्रति तोळावर आहेत. सोन्याचे दर या आठवड्याच्या सुरुवातीला चार महिन्यातील निचांकी पातळीवर होते. दरम्यान यामध्ये आठवडाभरात काहीशी सुधारणा झाली आहे. शुक्रवारी चांदीच्या दरातही (Silver Rates Today) वाढ झाली आहे. आज चांदीची वायदा किंमत 0.30 टक्क्यांनी वाढून  62,047 प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Prices in International Market) शुक्रवारी देखील स्थिर आहेत. स्पॉट गोल्डच्याा किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नसून आज दर 1,752.78 डॉलर प्रति औंस आहेत. या आठवड्यात दर 0.5 टक्क्यांनी कमी झाले आहेत. अमेरिकन सोन्याची वायदे किंमत 0.2% ने वाढून 1,754.40 डॉलर आहे. हे वाचा-SBI-PNB सह या बँकांच्या ATM मधून किती काढता येतील पैसे? वाचा काय आहे नियम 2 आठवड्यापूर्वी 48,390 रुपये प्रति तोळा होते सोन्याचे दर दोन आठवड्यापूर्वीच्या सोन्याच्या दराबाबत बोलायचं झालं तर  त्यावेळी दर 48,390 रुपये प्रति तोळा होते. दोन आठवड्यात सोन्याचे दर जवळपास 2000 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दर दोन आठवड्यापूर्वी 67,976 रुपये प्रति किलो होते. त्यामुळे आजपर्यंत चांदीच्या दरात साधारण 6000 रुपयांची घसरण झाली आहे. रेकॉर्ड हायपेक्षा सोनं स्वस्त गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 56200 रुपयांवर पोहोचले होते. सोन्याने त्यावेळी सर्वोच्च (Gold Rates on all time high) पातळी गाठली होती. त्यापेक्षा सोन्याचे दर 9450 रुपयांनी आज स्वस्त आहेत. तज्ज्ञांच्या मते सोनेखरेदीसाठी ही चांगली वेळ आहे. कारण सध्या सोन्याचे दर तुलनेने कमी आहेत. या वर्षअखेरपर्यंत सोन्याचे दर पुन्हा उसळी घेतील असा अंदाज आहे. त्यामुळे उतरलेल्या सोन्याच्या किंमतींकडे एक संधी म्हणून पाहण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

पुढील बातम्या