Home /News /money /

Gold Price Today: तीन महिन्यांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्यानंतर सोन्यात घरसण, आज आहे हा भाव

Gold Price Today: तीन महिन्यांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्यानंतर सोन्यात घरसण, आज आहे हा भाव

Gold Price Today: एमसीएक्स (MCX) वर सोन्याची वायदे किंमत 0.32 टक्क्यांनी घसरल्यानंतर दर 48,520 रुपये प्रति तोळा या स्तरावर आले आहे. तर चांदीमध्ये 0.4 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर दर 72,073 रुपये प्रति किलो झाले आहेत.

    नवी दिल्ली, 20 मे: गेले काही दिवस सोन्याच्या किंमती (Gold Price Today) सातत्याने वाढत होत्या, त्यानंतर आज या वाढीला ब्रेक लागला आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीत आज घसरण पाहायला मिळाली. तर चांदीचे दर (Silver Price Today) देखील सलग तिसऱ्या दिवशी कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमजोरीच्या संकेतांमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर उतरले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange MCX) वर सोन्याची वायदे किंमत 0.32 टक्क्यांनी घसरल्यानंतर दर 48,520 रुपये प्रति तोळा या स्तरावर आले आहे. तर चांदीमध्ये 0.4 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर दर  72,073 रुपये प्रति किलो झाले आहेत. आधीच्या सत्रात सोन्याचे दर गेल्या तीन महिन्यातील रेकॉर्ड स्तरावर होते. अर्थात सोन्याचे दर प्रति तोळा 48,700 या स्तरावर होते. त्यानंतर आज सोन्याचे दर उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर याठिकाणी सोन्याच्या व्यवहारात तेजी पाहायला मिळते आहे. अमेरिकेत सोन्याचे दर 11.26 डॉलरच्या तेजीनंतर 1,876.33 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 0.15 डॉलरच्या तेजीनंतर 27.74 डॉलरच्या स्तरावर आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर 50830 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नईमध्ये 50160 रुपये प्रति तोळा, मुंबईत 47000 रुपये प्रति तोळा आणि कोलकातामध्ये या शुद्धतेच्या सोन्याच्या दर 50470 रुपये प्रति तोळा आहे. हे वाचा-SBI मध्ये तुमचंही अकाऊंट आहे का? सर्वात मोठ्या बँकेने बदलले आपले नियम बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारातील दर दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 97 रुपये प्रति तोळाने उतरले होते. या घसरणीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर कमी होऊन 47,853 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदीच्या दरात बुधवारी 1,417 रुपयांची घसरण झाली होती, त्यानंतर दर प्रति किलो 71,915 रुपयांवर पोहोचले होते. का झाली घसरण? सीनिअर अनालिस्ट तपन  पटेल यांच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावरील चढउतारामुळे भारतातील सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन महिन्यातील सर्वोच्च स्तर पार करून 1,850 डॉलर प्रति औंसपेक्षा जास्त आहेत. कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. हे वाचा-शेतकऱ्यांसाठी कमाईची सुवर्णसंधी, मोदी सरकार या योजनेसह देतंय महत्त्वाच्या सुविधा या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या