Home /News /money /

Gold Price Today: सोन्याच्या दरात किरकोळ वाढ, चांदीही महागली; चेक करा नवे दर

Gold Price Today: सोन्याच्या दरात किरकोळ वाढ, चांदीही महागली; चेक करा नवे दर

दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 224 रुपयांनी वाढून 66,139 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 65,915 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

  मुंबई, 7 एप्रिल : आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत जागतिक ट्रेंड आणि रुपयाच्या मूल्यातील घसरण यामुळे गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोने 9 रुपयांच्या किरकोळ वाढीसह बंद झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 9 रुपयांनी वाढून 51,568 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 51,559 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. आज चांदीची किंमत किती झाली? (Silver Price Today) दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 224 रुपयांनी वाढून 66,139 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 65,915 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. सोन्याची आयात 45 अब्ज डॉलर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशाची सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून 45.1 अब्ज डॉलर झाली आहे. मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. यासह, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात 26.11 अब्ज डॉलर होती. Online Transaction करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? चिंता करु नका, 'अशा' प्रकारे मिळवता येतील पैसे पुन्हा कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. खुशखबर! 'या' क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना यंदा चांगली पगारवाढ मिळणार; रिपोर्ट्समधून माहिती समोर

  मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर -

  सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Gold and silver, Gold and silver prices today

  पुढील बातम्या