Gold Price: सोन्याच्या दराने मोडले आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड, वाचा आजचे भाव

Gold Price: सोन्याच्या दराने मोडले आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड, वाचा आजचे भाव

16 मार्च 2020 रोजी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 38,400 रुपये होती, त्यानंतर सोन्यामध्ये जवळपास 40 टक्के वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : दिल्लीचे मीडिया प्रभारी राजेश खोसला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ibja हे देशभरातील केंद्रांकडून सोन्या-चांदीची सरासरी किंमत दर्शवतं. 2011मध्ये स्पॉट मार्केटमध्ये चांदीच्या किंमतीत प्रति किलो 77,000 रुपयांची वाढ झाली. 16 मार्च 2020 रोजी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 38,400 रुपये होती, त्यानंतर सोन्यामध्ये जवळपास 40 टक्के वाढ झाली आहे.

का वाढल्या सोन्या-चांदीच्या किंमती

केडिया कमोडिटीजचे संचालक अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटामुळे सोन्या-चांदीच्या भाव कमी होण्याऐवजी वाढत आहेत. शेअर बाजाराच्या या अनिश्चिततेमुळे रिअल इस्टेटवरही परिणाम झाला आहे.

BREAKING: कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा पुराचा धोका, तब्बल 88 बंधारे पाण्याखाली

यामुळे गुंतवणूकदार आता सोनं, गोल्ड ईटीएफ आणि बाँडच्या दिशेने वळले आहेत. अशात सोन्याचे दर वाढत आहेत. दुसरीकडे, कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे, खाणींच्या किमतींवर परिणाम होतोय आणि पुरवठाही खंडित झाला आहे. दरम्यान, सध्या चांदीचे दरही जास्त असल्याचे दिसून येत आहे. याव्यतिरिक्त चीन आणि अमेरिका व्यवसायांमध्ये आणि अनेक मुद्द्यांवर तणाव वाढला आहे.

फक्त 5 हजार रुपयांत सुरू करा Post Office बिझनेस, अशी कराल दमदार कमाई

यावर्षी 35 टक्क्यांनी महाग झाले सोने

यावर्षी सोन्याच्या किंमतीमध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. जाणकारांच्या मते कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संकर्मनामुळेही स्थिती आणखी बिकट होत आहे. यामुळेच सोन्याचांदीच्या किमती वाढत आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 5, 2020, 2:46 PM IST

ताज्या बातम्या