Gold Price Today 5 oct: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरले सोन्याचे दर, चांदीही गडगडली

Gold Price Today 5 oct: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरले सोन्याचे दर, चांदीही गडगडली

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये सोने-चांदीच्या दरात आणखी घट पाहायला मिळू शकते. सोनं 48 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत उतरू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : आज आठवड्याच्या पहिल्य़ाच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. सकाळी 10च्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्यात 522 रुपयांची घसरण झाली होती. यासह 10 ग्रॅम सोन्याचे दर 50 हजार 048 रुपये आहेत. तर चांदीमध्येही 708 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. यासह प्रति किलो चांदीचे दर 60 हजार 437 झाले आहेत.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये सोने-चांदीच्या दरात आणखी घट पाहायला मिळू शकते. सोनं 48 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत उतरू शकते. तर, दिवळी सणापर्यंत सोने दरात वाढ झालेली पाहायला मिळू शकते. डिसेंबरच्या अखेरीस सोन्यांचे दर उच्चांक गाठू शकतात.

सध्या स्पॉट गोल्डच्या किंमती चांगल्या दिसत आहे. सध्या स्पॉट गोल्ड $1,840 प्रति औंसआहे. तर, येत्या काही दिवसांत एमसीएक्सवर सोनं 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत उतरू शकते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी येणारा कालावधी चांगला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वाचा-बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर लोन घेणं फायद्याचं की तोट्याचं?

दिवाळीपर्यंत सोनं गाठवणार उच्चांक

सोन्याचे जागतिक बाजारातही दर उतरत असले तरी येत्या काही महिन्यात सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ होऊ शकते. मुख्यत: दिवाळीत सोन्याचे दर 52 हजार 500 ते 53 हजारपर्यंत जाऊ शकतात. तर एमसीएक्स हे दर 55 हजार आणि रिटेल बुलियनमध्ये 57 हजारापर्यंत जाऊ शकतात.

वाचा-गृह कर्जाचे EMI भरून झाल्यानंतर आधी करा 'हे' काम, नाहीतर हातातून जाईल घर!

बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर लोन घेणं फायद्याचं?

सोन्याच्या लॉकरवर कर्ज घेतल्यानंतर लॉकरचं भाडं माफ केलं जातं पण कर्ज घेतल्यामुळे 9.5 टक्के व्याज भरावं लागतं. बँकेच्या लॉकरवर गोल्ड लोन घेण्यासाठी ओवरड्राफ्ट सुविधा दिली जात नाही. सोन्याच्या लॉकरवर कर्ज घेण्याचं आमिष अनेकदा गरजवंताना दाखवलं जातं. पण हे अयोग्य आहे. एरवी बँकेच्या लॉकरसाठी खातेदाराला वर्षातून एकदा पैसे भरावे लागतात. पण जर आपण सोन्याच्या लॉकरवर कर्ज घेतलं तर आपल्याकडून दामदुपटीने पैसे घेतले जातात. त्यामुळे पैशांअभावी आपण लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर लोन घ्यायचं ठरवलं तर त्याचं नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळे असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेणे फायद्याचे ठरते.

Published by: Priyanka Gawde
First published: October 5, 2020, 11:53 AM IST

ताज्या बातम्या