मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात आज वाढ; काय आहेत नवे दर?

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात आज वाढ; काय आहेत नवे दर?

गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किमतीने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज सोने डिसेंबर फ्युचर्स MCX वर 48,020 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 30 नोव्हेंबर : आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव (Gold Price today) 0.06 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचवेळी चांदीच्या दरात (Silver  rate today) 0.07 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव

ऑक्टोबर डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव आज 0.06 टक्क्यांनी वाढून 48,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. त्याचवेळी आजच्या व्यवहारात चांदीच्या दरात 0.07 टक्क्यांनी किरकोळ वाढ झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 62,482 रुपये आहे.

विक्रमी उच्चांकापेक्षा 8077 रुपये स्वस्त

गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किमतीने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज सोने डिसेंबर फ्युचर्स MCX वर 48,020 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8200 रुपयांनी स्वस्त आहे.

'Omicron Variant' मुळे 'या' क्रिप्टोकरन्सीत मोठी उसळी, तीन दिवसात 900 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स

सोन्याचा नवा भाव कसा पाहायचा?

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

देशातल्या प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर किती देतात व्याजदर; जाणून घ्या माहिती

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

First published:

Tags: Gold and silver prices today, Money