Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; चेक करा नवे दर
Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; चेक करा नवे दर
Gold-Silver Rates: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोने 51,452 रुपयांवर आले आहे, तर एक किलो चांदीचा दरही खाली आला आहे. आता चांदी 68,182 रुपयांना विकली जात आहे.
मुंबई, 28 मार्च : गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ आहे. अशाच सोनं खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोने 51,452 रुपयांवर आले आहे, तर एक किलो चांदीचा दरही खाली आला आहे. आता चांदी 68,182 रुपयांना विकली जात आहे.
जाणून घ्या आज सोन्याचा भाव किती आहे? (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 351 रुपयांनी घसरून 51,452 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 51,803 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
आज चांदीची किंमत किती झाली? (Silver Price Today)
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 561 रुपयांनी घसरून 68,182 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 68,743 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
निकृष्ट दर्जाचे प्रेशर कूकर विकणे महागात पडले, दोन कंपन्यांवर प्रत्येकी एक लाखाचा दंडसोन्याची शुद्धता कशी तपासाल?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
Uma Exports IPO आजपासून गुंतवणुकीसाठी ओपन; प्राईज बँड, इश्यू साईज, काय करते कंपनी? वाचा सविस्तरघरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर
सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.