Home /News /money /

Gold Rate today : सोने-चांदी आणखी स्वस्त, काय आहेत आजचे दर?

Gold Rate today : सोने-चांदी आणखी स्वस्त, काय आहेत आजचे दर?

गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीने (Gold Rate) 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 47,785 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे

    मुंबई, 2 डिसेंबर : लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव (Gold rate today) आज 0.18 टक्क्यांनी घसरला. त्याचवेळी चांदीचे भाव 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह (Silver rate today) व्यवहार करत आहेत. जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव? (Gold, Silver rate) फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.18 टक्क्यांनी घसरून 47,785 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. दुसरीकडे, आजच्या व्यवहारात चांदी 0.05 टक्क्यांनी घसरली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 61, 278 रुपये आहे. सोनं विक्रमी उच्चांकाहून 8400 रुपये स्वस्त 2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 47,785 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8400 रुपयांनी स्वस्त होत आहे. Multibagger Stock : 9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर सोन्याचा नवा भाव कसा पाहायचा? सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी याहून चांगली योजना नसेल! 18 व्या वर्षी मिळतील 65 लाख सोन्याची शुद्धता कशी तपासायची? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या