मुंबई, 19 ऑक्टोबर : आठवड्याच्या पहिल्याच दिवसात आज सोन्याच्या दरात (Gold Price Today 19 October) किंचितशी वाढ झालेली दिसून आली. शुक्रवारी सोन्याचा दर दहा ग्रॅम 50 हजार 547 रुपये होता. आज 5 रुपयांच्या किंचित वाढीसह दर प्रति 10 ग्रॅम 50 हजार 552 रुपये झाला आहे. दरम्यान, सुरुवातीच्या व्यापारात सोन्याची घसरण सुरू झाली. केवळ काही मिनिटांच्या व्यापारात सोन्याने दर 10 ग्रॅम 50,437 रुपये झाले.
कमकुवत मागणीमुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्या ठेवी कमी केल्यानंतर शुक्रवारी वायदा बाजारात सोन्याचे भाव 0.090 टक्क्यांनी घसरून सोन्याची किंमत 50 हजार 665 झाली. तर, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरमधील सोन्याचे वायदे 47 रुपये म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून 50 हजार 665 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.10 टक्क्यांनी वधारून ते 1,910.90 डॉलर प्रति औंस झाले.
वाचा-भाववाढीमुळे पहिल्या सहामाहीत सोन्याच्या आयातीत घटयेत्या काळात सोन्याच्या किंमती वाढणार?
कोरोना विषाणूमुळे शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. जगभरातील बहुतेक स्टॉक मार्केट्स कोरोनामुळे पडझडीमुळे सावरत आहेत, तर दुसरीकडे सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आता प्रश्न उद्भवतो की सोने देखील कोरोनापूर्व काळात परत येईल की नाही, कारण ट्रेंड असे दिसून आले आहे की जर शेअर बाजार मजबूत असेल तर सोनं अजूनही स्वस्त होईल. जानेवारीत सेन्सेक्स 41 हजारांच्या जवळ होता, तेव्हा सोन्याची किंमतही 41 हजारांच्या जवळ होत्या.
वाचा-25000 पगार असणाऱ्यांसाठी चांगली बातमी, सरकार देणार 19 प्रकारच्या सुविधासोन्याच्या आयातीत घट
पहिल्या सहामाहीत देशात 15.8 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 1,10,259 कोटी रुपयांची सोन्याची आयात झाली होती. यावर्षी एप्रिल-सप्टेंबरदरम्यान, चांदीची आयातही कमी झाली होती. आयात आणि निर्यातीत जे अंतर असतं, त्यालाच Current Account Deficit (CAD) म्हणतात. एप्रिल - सप्टेंबरमध्ये CAD मध्ये घट होऊन तो 24.33 अब्ज डॉलरवर आला. जो यापूर्वी, याच काळात 88.92 अब्ज डॉलर होता.
वाचा-दुकानदार कॅरी बॅगचे जास्त पैसे घेतो? आता इथं करा तक्रार; होणार कारवाईभारतात दरवर्षी इतकी होते सोन्याची आयात
जगभरात जितके देश सोन्याची आयात करतात, त्या मोठ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारत वर्षभरात जवळपास 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. ज्वेलरी इंडस्ट्रीची (jewelery industry) मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक सोन्याची आयत केली जाते. करेंट फिस्कल ईयरच्या पहिल्या सहामाहीत रत्न आणि ज्वेलरीची निर्यात (Export) 55 टक्के घसरुन 8.7 अब्ज डॉलर होती.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.