Home /News /money /

Gold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची संधी; वाचा काय आहेत नवे दर?

Gold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची संधी; वाचा काय आहेत नवे दर?

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण आज सोन्याच्या दरात आणखी घट झाली आहे. ग्लोबल मार्केटच्या (Global Market) कमजोरीमुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

    मुंबई, 18 जानेवारी : लग्नसराईच्या मोसमात सोनं खरेदीत (Gold Shopping) नक्कीच वाढ होते. मागील वर्षी जानेवारी सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता. मात्र तुलनेनं यावर्षी सोन्याचे भाव कमी (Gold Rate today) आहेत. त्यामुळे लोकही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे अशी सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण आज सोन्याच्या दरात आणखी घट झाली आहे. ग्लोबल मार्केटच्या (Global Market) कमजोरीमुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. नवी दिल्ली सोन्याचे दर मंगळवारी 23 रुपयांना कमी झाले. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रतितोळा 47814 रुपयांवर आले आहे. मागील व्यापारी सत्रात सोन्याचे दर 47837 रुपये प्रती 10 ग्रॅम होते. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिल्ली सराफा बाजारातील सोन्याच्या दराबाबत ही माहिती दिली आहे. मंगळवारी चांदीचा भाव (Silver rate today) स्थिर राहिला. चांदीचे दर मंगळवारी 61,835 प्रति किलो राहिले. तर मागील ट्रेडिंग सत्रात 61,836 रुपये प्रति किलो होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,817 डॉलर प्रति औंसवर थोडे कमी झाले, तर चांदी 22.94 डॉलर प्रति औंसवर स्थिर झाली. EPFO : कोरोना संकटाना Umang App वरुन काढा पैसे; PF Advance चा फायदा घेण्यासाठी काय कराल? कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. चहा, कॉफी प्या आणि बिल Cryptocurrency मध्ये भरा; कुठे सुरु झालीय ही सुविधा? घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या