नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : पाच महिन्यांतील सर्वात वाईट आठवड्यानंतर सोन्याच्या किंमतीत (Gold Prices) सोमवारी मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. चीन आणि अमेरिकेत व्यापार संबंधात संभाव्य सुधारणा होण्याची चिन्हे असूनही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. स्पॉट गोल्ड (Spot Gold) 0.5 टक्क्यांनी घसरून 1,934.91 डॉलर प्रति औंस झाले आहे. गेल्या आठवड्यात सोन्यात 4.5% घसरण झाली होती, जी मार्चनंतरची सर्वात मोठी घसरण होती. तर, जागतिक वायदे बाजारात किंमती वाढ दिसून आली आहे. यूएस गोल्ड फ्यूचरमध्ये 0.3 टक्क्यांनी वाढ होऊन किंमत 1,943.50 डॉलर प्रति डॉलर झाली आहे.
एमसीएक्स एक्सचेंजला रात्री 9 वाजता सोन्याची किंमत वायद्या बाजारात 97 रुपयांनी घसरून 52 हजार 130 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. एमसीएक्सवर 4 सप्टेंबर 2020 रोजी चांदीचे दर सकाळी 9 वाजता 111 रुपयांनी घसरून 67 हजार 060 रुपये प्रतिकिलो होता.
वाचा-सोन्याचे भाव रेकॉर्ड स्तरावर पण 1947 मध्ये आजच्या दूधाच्या दरामध्ये मिळायचं सोनं
देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याचा भाव 4000 रुपयांनी घसरले
अमेरिकेत सरकारी बाँडच्या (US Bond Yields) उत्पन्नात वाढ झाल्याने सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. शिवाय सोन्याच्या किंमती जोरात वाढताना गुंतवणूकदारांकडून नफा बुकिंगही करण्यात आले. यामुळेही आठवड्यात सोन्याच्या किंमती घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या आठवड्यातही सोन्याच्या किंमती कमी झाल्या. शुक्रवारी सोन्याचा दर 1.5 टक्क्यांनी घसरून 52,170 रुपये होता. आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये प्रति दहा ग्रॅम 2600 रुपयांनी घट झाली असली.
वाचा-आता जुने सोने आणि दागिने विकताना द्यावा लागणार GST? वाचा सविस्तर
का वाढत आहेत सोन्याच्या किंमती?
सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. जगभरातील शेअर बाजारांमध्ये होणाऱ्या बदलावांचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर देखील होतो. डॉलरच्या तुलनेत घसरणारे रुपयाचे मुल्य देखील सोन्याच्या किंमतीवर परिणाम करते. कोरोनाच्या संकटकाळात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. सोन्याचांदीच्या किंमतींनी या कालावधीमध्ये रेकॉर्ड रचला होता. मात्र येणाऱ्या काळात या किंमती उतरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.