Home /News /money /

Gold Price: सोने दर 53000 जवळ, आता खरेदीसाठी योग्य वेळ आहे का?

Gold Price: सोने दर 53000 जवळ, आता खरेदीसाठी योग्य वेळ आहे का?

कमॉडिटी मार्केटच्या जाणकारांनुसार, अमेरिकेतील महागाई, रशिया-युक्रेन संकट संपायचं नाव नाही. या अनेक कारणांमुळे भविष्यात सोन्याचा भाव वाढू शकतो.

  नवी दिल्ली, 16 एप्रिल : रशिया आणि युक्रेनमधील तणाव अद्यापही कायम असल्याने, तसंच अमेरिकेतील महागाईने मागील 40 वर्षांतील उच्चांक गाठल्यामुळे भारतात सोन्याच्या किमतीवर याचा परिणाम दिसतो आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या किमती जून 2022 च्या फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टसाठी 53000 रुपये प्रति 10 ग्रॅमजवळ पोहोचला आहे. कमॉडिटी मार्केटच्या जाणकारांनुसार, अमेरिकेतील महागाई, रशिया-युक्रेन संकट संपायचं नाव नाही. या अनेक कारणांमुळे भविष्यात सोन्याचा भाव वाढू शकतो. भारतीय बाजारात, एमसीएक्सवर सोन्याचा भाव 53,500 ते 53,800 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत (Gold Price Today) पोहोचू शकतो. रेलिगेयर ब्रोकिंग लिमिटेडमध्ये कमडिटी अँड करन्सी रिसर्चच्या उपाध्यक्षा सुगंधा सचदेवा यांनी सांगितलं, रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष हे सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचं एक कारण आहे. या दोन्ही देशातील शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. तसंच वाढत्या महागाईचा रिपोर्ट बाजारातील गोष्टींवर परिणाम करत आहे. मार्चमध्ये अमेरिकी वार्षिक सीपीआय वाढून 8.5 टक्के झाला आहे. हा 40 वर्षांचा रेकॉर्ड आहे. ब्रिटनमधील मार्च महिन्यातील चलनवाढीच्या आकडेवारीत जगातील सर्वाधिक महागाई दर दिसला. यामुळे सोनं खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. रशियावर नवीन निर्बंध येण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या किमतीतही या आठवड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे जागतिक चलनवाढीची भीती आणखी वाढली आहे. त्यामुळे याचा परिणामही सोने दरावर होऊ शकतो.

  हे वाचा - Property Tips: घर खरेदी करण्यापूर्वी 'ही' महत्त्वाची कागदपत्रं नीट तपासा; फसवणूक होण्यापेक्षा सावध राहा

  IIFL सिक्योरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी देशांतर्गत घटकांबद्दल बोलताना सांगितलं, की भारतात लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. सोन्याचा किमतीसाठी हे प्रमुख देशांतर्गत ट्रिगर म्हणून काम करेल, कारण एप्रिल ते जूनमध्ये सोन्याची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

  पुढील बातम्या