Gold Price Today: खूशखबर..! सोनं 8,000 रुपयांनी झालं स्वस्त; किंमतींमध्ये मोठी घसरण, पाहा आजचे दर

Gold Price Today: खूशखबर..! सोनं 8,000 रुपयांनी झालं स्वस्त; किंमतींमध्ये मोठी घसरण, पाहा आजचे दर

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहचले होते. या दराच्या तुलनेत सोनं आजही 8,000 हजार रुपयांनी स्वस्त दरात मिळत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून : आठवड्याच्या दुसर्‍याच दिवशी देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. यापूर्वी सोमवारीसुद्धा सोन्या-चांदीच्या (Gold silver Price)  भावात घट झाली होती. मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशीही या मौल्यवान धातूंच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये सतत घसरण होत आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,760 रुपयांवरून घसरून 47,730 रुपये प्रति ग्रॅम झाले. त्याचबरोबर आज चांदीचा भाव 71,900 रुपये प्रतिकिलो होता.

8000 रुपयांनी सोनं झालं स्वस्त -

नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय दराच्या तुलनेत सोने आणि चांदीचे भाव आज भारतीय बाजारामध्ये गडगडले. एमसीएक्सवर तिसर्‍या दिवशी सोन्याचे दर घसरून 48,493 रुपयांवर आले, तर चांदी 0.8 टक्के घसरून 71,301 रुपये प्रति किलो वर आली. मागील सत्रात सोन्याच्या दरात ०.8 टक्क्यांनी तर चांदी ०.56 टक्क्यांनी घसरली होती. या महिन्याच्या सुरूवातील सोनं पाच महिन्यातील उच्चांकी 49,700 या दराने मिळत होते. मात्र, त्यानंतर दरांमध्ये सातत्यानं घसरण नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहचले होते. या दराच्या तुलनेत सोनं आजही 8,000 हजार रुपयांनी स्वस्त दरात मिळत आहे.

मोठ्या शहरांमधील सोन्याचे भाव

गुड रिटर्ननुसार, नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,650 रुपये आहे. चेन्नईमध्ये ती 45,750 रुपयांवर आली आहे. त्याचबरोबर मुंबईतील 22 कॅरेट सोन्याचा दर 47,760 / 10 ग्रॅम आहे. चांदीच्या दरात 400 रुपयांनी घट झाली असून सध्याचा दर 72,300 रुपये प्रति किलो झाला आहे, गेल्या आर्थिक दिवसात हा दर 71,900 रुपये एवढा होता.

हे वाचा - सुरू करा हा दमदार नफ्याचा व्यवसाय, 9 लाखांपर्यंत कमाई, सरकारही करेल मदत

जागतिक सोन्याचा भाव

ब्लूमबर्ग वेबसाईटनुसार, सोमवार संध्याकाळी कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 0.98 टक्क्यांनी किंवा 18.50 डॉलरच्या मोठ्या घसरणीनंतर 1861.10 डॉलर प्रति औंसवर लटकल्याचा दिसत होता. तर सोन्याचा वैश्विक भाव सध्या 1.02 टक्के किंवा 19.12 डॉलरवरून घसरून  1858.41 डॉलर प्रति औंस वर आल्याचे दिसून आले.

Published by: News18 Desk
First published: June 15, 2021, 1:52 PM IST

ताज्या बातम्या