Home /News /money /

Gold Price Today: सोने दरात वाढ, तर चांदीचा भाव उतरला; पाहा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोने दरात वाढ, तर चांदीचा भाव उतरला; पाहा लेटेस्ट रेट

आज पुन्हा सोने दरात (Gold Price) वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोने दरात 86 रुपयांची वाढ होऊन भाव 48,555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.

    नवी दिल्ली, 25 जानेवारी : आज पुन्हा सोने दरात (Gold Price) वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोने दरात 86 रुपयांची वाढ होऊन भाव 48,555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. मागील सत्रात सोने दर 48,469 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोने दरात वाढ होत आहे. सोमवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 16 पैशांनी घसरला. या घसरणीसह रुपया 74.67 वर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजने दिल्ली सराफा बाजारातील रेट्सबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार, मंगळवारी चांदीच्या दरात (Silver Price Today) 522 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा भाव आता 63,907 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मागील सत्रात चांदीचा भाव 64,429 रुपये प्रति किलोग्रॅम होता. 2020 मध्ये याच काळात MCX वर सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज सोनं MCX वर 48,605 रुपये प्रति 10 ग्रॅम लेवलवर आहे.

    हे वाचा - Insurance Policy : विमा संबंधित तक्रार कुठे आणि कशी कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

    हे वाचा - घरबसल्या महिन्याला कमवा 60 हजार रुपये, जाणून घ्या SBI ची नवी योजना

    कोरोनाचा काळ अनेकांसाठी आर्थिक तंगीचा असला तरी या काळात सोन्याच्या दागिन्यांची (Gold Demand Hike in India) मागणी वाढली आहे. सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात (एप्रिल ते डिसेंबर 2021) दुपटीपेक्षा अधिक होऊन 38 अब्ज डॉलरवर पोहोचली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. देशात मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या