मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला सोने दरात वाढ, इथे तपासा मुंबईतील आजचा सोन्याचा भाव

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला सोने दरात वाढ, इथे तपासा मुंबईतील आजचा सोन्याचा भाव

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) शुक्रवारी सोन्याचा भाव 46,603 रुपये होता. त्यानंतर आज भाव (Gold Price on MCX) 48,189 रुपये प्रति 10 ग्रॅम असून शुक्रवारनंतर 414 रुपये अधिक आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीला आज सोने (Gold Price) दरात वाढ पाहायला मिळाली. फ्यूचर ट्रेडिंगमध्ये गोल्ड रेटमध्ये काहीशी वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) शुक्रवारी सोन्याचा भाव 46,603 रुपये होता. त्यानंतर आज भाव (Gold Price on MCX) 48,189 रुपये प्रति 10 ग्रॅम असून शुक्रवारनंतर 414 रुपये अधिक आहे.

जिंस बाजार विशेषज्ञांनुसार, सोने दरात अद्यापही तेजी आहे. MCX वर आज सोन्याचा दर 48,603 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. परंतु पुढील पंढरवड्यातही हा भाव 48,603 रुपयांवरुन 49,500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची सोपी पद्धत शोधताय, मग 'ही' बातमी तुमच्यासाठी

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने दरात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओसवाल कमॉडिटी रिसर्चचे उपाध्यक्श अमित सजेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात फेडरल रिझर्व्हची बाँड टेंपरिंग घोषणा बाजाराशी सुसंगत नव्हती. फेडच्या बैठकीनंतर बाजारात सोने दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. पुढेही ही वाढ अशीच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Mutual Fund : SIP सुरु करण्याची योग्य तारीख कोणती? पेमेंट वेळेत न झाल्यास काय?

Good returns नुसार, दिल्ली सराफा बाजारात 22 कॅरेट शुद्धतेच्या सोनोचा दर 4,785 रुपये प्रति 1 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 47,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,680 रुपये प्रति तोळा आहे.

आता मोफत बदलून घ्या फाटलेल्या नोटा; परत मिळतील पूर्ण पैसे, जाणून घ्या प्रक्रिया

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर

तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today