मुंबई, 28 नोव्हेंबर : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (New Covid variant) संपूर्ण जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये पडझड होताना दिसत आहे. तर सोन्याच्या किमतींमध्ये (Gold Rate today) यामुळे मोठी उसळी पाहायला मिळाली. शुक्रवारी एमसीएक्स (MCX) वर सोन्याच्या किमती 219 रुपये प्रति 10 ग्रॅमनं वाढल्या आहेत. त्यानंतर डिसेंबर वायदा सोन्याचे दर 47,640 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा दिसतोय परिणाम
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या नवीन वेरिएंटमुळे इक्विटी मार्केटमध्ये (Equity Market) विक्रीचा जोर आहे, त्यामुळे सोन्याची खरेदी वाढत आहे. गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढला आहे, त्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. सोन्याच्या किमतीत सध्याची वाढ कोविडच्या केसेसमुळे होत असल्याचं बोललं जात आहे.
याशिवाय अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीमुळेही सोन्याची चमक वाढली आहे. सोन्याच्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत अधिक फायद्यासाठी खरेदी करण्याचा सल्ला बाजारातील तज्ज्ञ देत आहेत.
22 आणि 24 कॅरेट सोन्यातील फरक काय? 22 Karat सोन्याला का म्हणतात 916 Gold
मुल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) 46,900 रुपये प्रति 10 स्तरावर स्टॉप लॉस ठेवून, 48,700 रुपयांच्या अल्प मुदतीच्या टार्गेटसाठी 47,500 ते 47,700 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर सोने खरेदी करता येईल. एका महिन्यात सोन्याचा भाव 49,700 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. 2022 च्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 52,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव पुढील वर्षी 2022 च्या अखेरीस 2,000 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो.
या मराठी तरुणाला मोदी सरकारकडून मिळाले 90 लाख! PM Modi यांनी केलं कौतुक
सोन्याचा दर काय आहेत?
www.goodreturns.in नुसार, दिल्लीत आज 22 कॅरेज सोन्याची किंमत 4,721 रुपये प्रति ग्रॅम नोंदवली गेली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 5,150 रुपये प्रति ग्रॅम होता. 1 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,550 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. दोन महिन्यांत सोन्याने दहा ग्रॅमला सुमारे दोन हजार रुपयांचा परतावा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.