मुंबई, 3 डिसेंबर : लग्नसराईचा मोसम सुरु झाला आहे. त्यामुळे दागिन्यांची खरेदी वाढत आहे. त्यात आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज (Gold price today) 0.49 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदी (Silver Price today) 0.11 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
सोन्याच्या दरात वाढ होऊनही सोने विक्रमी उच्चांकापासून 8565 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 47,635 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8,565 रुपयांनी स्वस्त होत आहे.
सोन्या-चांदीचे आजचे दर
ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.49 टक्क्यांनी वाढून 47,635 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या व्यवहारात चांदी 0.11 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 61,190 रुपये आहे.
Paytm ला पहिल्यांदा एखाद्या ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईज किती?
सोन्याचा नवा भाव कसा पाहायचा? (How to check gold price)
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'हा' स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, तुमच्याकडे आहे का?
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.