मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price: सोन्याच्या दरात आठवडाभरात तेजी, सोनं किती रुपयांनी महागलं?

Gold Price: सोन्याच्या दरात आठवडाभरात तेजी, सोनं किती रुपयांनी महागलं?

Gold Rate: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 52,140 रुपयांवर बंद झाला. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तो 51,623 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

    मुंबई, 7 ऑगस्ट : सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. या आठवड्यात सोन्याचा दर 52 हजारांच्या पुढे गेला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा सोन्याचा दर वाढला आहे. भारतीय सराफा बाजारात या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 52,140 रुपयांवर बंद झाला. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तो 51,623 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. या आठवड्यात सोन्याचे भाव या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली होती, मात्र गेल्या दोन दिवसांत हे दर झपाट्याने वाढले आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, सोमवारी 1 ऑगस्ट रोजी सोने 51,405 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. मंगळवारी दर वाढले आणि नंतर वरच्या दिशेने पुढे जात राहिले. Online Shoppingवर होईल मोठी बचत, 'या' खास क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध आहेत विविध ऑफर्स बुधवारी सोन्याचा दर 51,486 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गुरुवारी ते 51,815 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले. शुक्रवारी सोन्याचा भाव 52 हजारांच्या पुढे गेला आणि तो 51,140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 5 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव सर्वाधिक 52,140 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 51,931 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सर्व प्रकारच्या सोन्याचे दर कर न लावता मोजले गेले आहेत. सोन्यावरील जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात. सोन्याचे दागिने खरेदी केल्यास त्यावर करानंतर मेकिंग चार्जही आकारला जातो, त्यामुळे भाव वाढतात. कॅनरा बँकेच्या ग्राहकांना झटका; कर्जाचे व्याजदर महागल्याने EMI वाढणार कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या