• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: मंगळवारी सोन्याचांदीला झळाली, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं; वाचा सविस्तर

Gold Price Today: मंगळवारी सोन्याचांदीला झळाली, तरी देखील 10000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं; वाचा सविस्तर

Gold Silver Price, 13 July 2021: मंगळवारी सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते डॉलरमधील कमजोरीमुळे आज देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 13 जुलै: आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या मजबुतीमुळे दिलीतील सराफा बाजारात 13 जुलै रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) किरकोळ वाढले आहे. आज सोन्याला काहीशी झळाळी मिळाली असली तरी रेकॉर्ड हायच्या अर्थात सर्वोच्च स्तरापेक्षा सोन्याचे दर 10000 रुपयांनी कमी आहेत. चांदीच्या दरातही आज (Silver Price Today) तेजी पाहायला मिळते आहे. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर (Gold Rates) दिल्लीतील सराफा बाजारात 46,766 रुपये प्रति तोळा होते तर चांदीचे दर (Silver Rates) 67,498 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. सोन्याचे नवे दर (Gold Price, 13 July 2021) दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीमध्ये केवळ 90 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,856 रुपये प्रति तोळा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊन दर 1,809 डॉलर प्रति औंस झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचे दर 57,008 रुपये प्रति तोळा होते, हा सोन्याचा सर्वोच्च दर आहे. या आधारे रेकॉर्ड हायपेक्षा आज सोन्याचे दर प्रति तोळा 10,152 रुपयांनी स्वस्त आहेत. हे वाचा-खरेदी करा स्वस्त सोनं, मोदी सरकार देत आहे गुंतणुवकीची संधी; काय सांगतात तज्ज्ञ? चांदीचे नवे दर (Silver Price, 13 July 2021) चांदीच्या किमतीत आज देखील तेजी पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीचे दर 490 रुपयांनी वाढले आहेत. या वाढीनंतर चांदीचे भाव 67,988 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात आज फार बदल झाला नाही आणि याठिकाणी चांदीचे दर 26.21 डॉलर प्रति औंस आहेत. हे वाचा-उद्यापासून आहे बंपर कमाईची संधी, 14040 रुपयांची गुंतवणूक करून व्हाल मालामाल का वाढले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते डॉलरमधील कमजोरीमुळे आज सोन्याचे दर वाढले आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वीपी कमोडिटी रिसर्च नवनीत दमानी यांच्या मते, अमेरिकेत महागाईच्या आकडेवारीच्या प्रतीक्षेत डॉलरमध्ये कमजोरी पाहायला मिळते आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत चढउतार पाहायला मिळतो आहे, ज्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर होत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: