Gold Rates Today: लग्नसराईमध्ये आजही वधारले सोन्याचे दर, चांदीमध्ये 1,404 रुपयांची वाढ

Gold Rates Today: लग्नसराईमध्ये आजही वधारले सोन्याचे दर, चांदीमध्ये 1,404 रुपयांची वाढ

देशांतर्गत वायदे बाजारात जरी आज फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्य सोन्याचे दर (Gold Rates) कमी झाले असले तरीही स्पॉट गोल्डची किंमत आज वधारली आहे. भारतीय बाजारात आज चांदी देखील (Silver Rates on Tuesday) 1400 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त किंमतीने महागली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी: देशांतर्गत बाजारात आज सोन्याच्या दरात (Gold Price) वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात 12 जानेवारी 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) प्रति तोळा 297 रुपयांनी वधारले आहेत. मंगळवारी चांदीच्या दरात (Silver Price Today) आज 1404 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 48,649 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. तर चांदीचे दर 63,976 रुपये प्रति किग्रा होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्या चांदीचे दर आज वाढल्याचं पाहायला मिळालं.

सोन्याला झळाळी (Gold Price on 12th January 2021)

दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोनं प्रति तोळा 297 रुपयांनी महागलं. लग्नसराईच्या या काळात सोन्याचे वाढणारे भाव सामान्यांसाठी चिंतेचा विषय बनत आहेत. या वाढीनंतर 99.9  शुद्धतेच्या सोन्याची किंमत 48,946 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 48,649 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून 1,858 डॉलर प्रति औंस आहेत.

(हे वाचा- बँक खात्याचा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक बदलायचा आहे? घरबसल्या करा हे काम)

चांदीही वधारली (Silver Price on 12th January 2021)

सोन्याप्रमाणेच चांदीमध्ये देखील मंगळवारी वाढ झाली आहे. चांदीच्या किंमती 1404 रुपये प्रति किलोने महागल्या आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीच्या 1404 रुपयांची वाढ प्रति किलोमागे झाली आहे.  यानंतर चांदीचे दर प्रति किलो 65,380 रुपये झाले आहेत. याआधीच्या सत्रात चांदीचे भाव 63,976 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात  (International Market) चांदीचे भाव  25.39 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते.

(हे वाचा- खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये FD काढली असल्यास मिळेल ही सुविधा,घरबसल्या होईल काम पूर्ण)

का वाढले सोन्याचांदीचे भाव?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल (कमोडिटीज) यांच्या मते, जगभरात वाढणारे कोरोनाचे संक्रमण, पॉझिटिव्ह केसेसचा समोर येणारा आकडा पाहता गुंतवणूकदार पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. अशावेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यांमध्ये पैसे गुंतवले जात आहेत. कोव्हिड काळात जागतिक अर्थव्यवस्था रुळावर आणण्याबाबतही गुंतवणूकदारांमध्ये चिंता आहे. यामुळेच सोन्याचांदीच्या किंमती वधारल्या आहेत. 

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 12, 2021, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading