Home /News /money /

Gold Price on 25th September: सोन्या-चांदीच्या घसरणीला लागला ब्रेक, इथं वाचा 14 ते 24 कॅरेटचे वाढलेले दर

Gold Price on 25th September: सोन्या-चांदीच्या घसरणीला लागला ब्रेक, इथं वाचा 14 ते 24 कॅरेटचे वाढलेले दर

सोन्याची खरेदी करण्यासाठी हा काळ जरी चांगला असला तरी सराफा बाजारात मागणी कमी असल्याने मोठ्या प्रमाणात सूट दिल्यानंतरही लोक पूर्वीप्रमाणे सोन्याकडे आकर्षित होत नाही आहेत.

    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला. एकीकडे जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर (Gold Price) घसरत आहेत. मात्र सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 324 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरात 2124 रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. जागतिक बाजारपेठेत सोन्यात तेजी दिसून आली. सोन्याचे 1873 डॉलर प्रति औसवर तर चांदीचे दर 23.10 डॉलर प्रति औंस होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, “दिल्लीत 24 कॅरेट स्पॉट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 324 रुपये महाग झाली आहे. हे आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री दर्शवते. गुरुवारी सायंकाळच्या सत्रानंतर सोन्याच्या किंमती सुधारल्या आहेत. वाचा-नवीन कायद्यानंतर बदलला Gratuity चा नियम, वाचा आता कुणाला आणि केव्हा मिळतील पैसे गेल्या महिन्यात 7 ऑगस्ट रोजी सोन्याने फ्युचर्स मार्केटमध्ये उच्चांक गाठला होता. प्रति 10 ग्रॅमची किंमत 56,200 रुपये झाली होती. आज सोन्यानेही प्रति 10 ग्रॅम किमान 49,725 रुपयांची पातळी गाठली. म्हणजेच तेव्हापासून सोन्याचे दर जवळपास 6,475 रुपयांनी घसरले आहेत. सोन्याची खरेदी करण्यासाठी हा काळ जरी चांगला असला तरी सराफा बाजारात मागणी कमी असल्याने मोठ्या प्रमाणात सूट दिल्यानंतरही लोक पूर्वीप्रमाणे सोन्याकडे आकर्षित होत नाही आहेत. चांदीच्या नव्या किंमती(Silver Price)- आज चांदीच्या दरातही वाढ झालेली पाहायला मिळाली. शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीची किंमत 2124 रुपयांनी घसरून 60,536 रुपयांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीचे दर प्रति औंस 23 डॉलर आहेत. वाचा-भारतात 1000 कोटींची गुंतवणूक करू इच्छिते 'ही' चिनी कंपनी, सरकार देणार मंजुरी? सोन्याच्या किंमती (Gold Price)-जागतिक बाजारपेठेतील किंमतीत घसरण झाल्यानंतर दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 324 रुपयांनी वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,873 डॉलर होते. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 49 हजार 846 रुपये होते. तर, 23 कॅरेटचे 49 हजार 646. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 45 हजार 659 रुपये आहेत. त्याचबरोबर 18 कॅरेटचे दर 37 हजार 385 आणि 14 कॅरेटचे दर 29 हजार 160 आहेत. वाचा-खिशात डेबिट-क्रेडिट कार्ड नसेल तरीही करता येईल पेमेंट, ही बँक देतेय खास सुविधा अमेरिकेत वाढणाऱ्या बेरोजगारीचा सोन्यावर परिणाम अमेरिकेतील साप्ताहिक बेरोजगारीच्या आकडेवारीमुळे असे समजते आहे की, ऑगस्टच्या अखेरीपर्यंत 3 कोटी अमेरिकन लोकं बेरोजगारी भत्त्याचा लाभ घेत आहेत. यानंतर अशी अपेक्षा वाढली आहे की, फेड रिझर्व्ह आणि अमेरिकन सरकार पुन्हा एकदा पॅकेजची घोषणा करू शकतात. जेणेकरून अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास मदत होईल. जाणकारांच्या मते केंद्रीय बँका आता देखील अर्थव्यवस्थेमध्ये लिक्वीडिटी वाढवतील. सोन्याच्या किंमतीसाठी हे सकारात्मक असेल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या