Home /News /money /

सोन्याला झळाळी! 50000 रुपयांवर पोहोचणार Gold Rate, आता आहे गुंतवणुकीची संधी?

सोन्याला झळाळी! 50000 रुपयांवर पोहोचणार Gold Rate, आता आहे गुंतवणुकीची संधी?

गेल्या काही काळापासून महागाई (Inflation) वाढत आहे. पेट्रोल (petrol and diesel price) आणि डिझेलच्या दरात वाढ कायम होती. त्यात आता सोन्याचे भाव (gold rates) वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात सोन्याची प्रतितोळा किंमत 50 हजार रुपयांचा टप्पा पार करील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 12 फेब्रुवारी: गेल्या काही काळापासून महागाई (Inflation) वाढत आहे. पेट्रोल (petrol and diesel price) आणि डिझेलच्या दरात वाढ कायम होती. त्यात आता सोन्याचे भाव (gold rates) वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात सोन्याची प्रतितोळा किंमत 50 हजार रुपयांचा टप्पा पार करील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महागाई, सोने-चांदीच्या दरात वाढ किंवा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतली वाढ फक्त भारतातच नाही, तर जगभरात आहे. अमेरिकेसह जगभरात वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरातही सातत्याने (gold price hike) वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (Gold rate on Multi Commodity Exchange) सोन्याचा भाव 49 हजारांवर पोहोचला असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कमोडिटी एक्सपर्ट आणि केडिया अ‍ॅडव्हायझरीचे डायरेक्टर अजय केडिया सांगतात, की महागाईचा धोका जसजसा वाढेल तसतसा सोन्याच्या किमतीवरही परिणाम होईल. MCX वर सोन्याची किंमत 49 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचल्यानंतर पुढे ती किंमत 50 हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता गुंतवणूक केल्यास भविष्यात यातून चांगला नफा तुम्हाला मिळवता येईल. आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) सोन्याचा भावही 1,852 डॉलर प्रति औंसवर पोहोचला असून, ही सध्याची सर्वोच्च पातळी आहे. लवकरच तो 1,865 डॉलरचा नवीन उच्चांक गाठू शकतो, असंही म्हटलं जातं आहे. हे वाचा-दरमहा 300 रुपयांची बचत करून जमा करा 10 लाखांचा फंड, कशाप्रकारे कराल गुंतवणूक? कच्च्या तेलाच्या किमती आणि रशिया-युक्रेन तणावाचा परिणाम होणार अजय केडिया यांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती (Crude oil prices) प्रति बॅरल 90 डॉलरच्या वर राहिल्या आहेत, त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. महागाईचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे भाव वाढतील. दुसरीकडे, रशिया आणि युक्रेनदरम्यानच्या (tension between Russia and Ukraine) वाढत्या तणावामुळे क्रूडच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्यामुळे इंधन महाग होऊन भारतासह जगभरातील महागाईवर परिणाम होणार आहे. हे वाचा-Income Tax : वैयक्तिक कर्जावरही मिळेल कर सवलत, यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 1982 नंतर अमेरिकेत सर्वाधिक महागाई अमेरिकेतली किरकोळ महागाई (Consumer Inflation) 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने (US Labour Department) अलीकडेच सांगितलं, की देशातल्या ग्राहक चलनवाढीचा दर 7.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर 1982 नंतरचा उच्चांक आहे. वाढत्या महागाईमुळे फेड रिझर्व्हवर (Fed Reserve) कर्जावरचा व्याजदर वाढवण्याचा (raise interest rates on loans) दबावही वाढला आहे. म्हणजेच, येत्या काळात महागाईपासून लगेच दिलासा मिळणार नाही.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

पुढील बातम्या