Home /News /money /

एका दिवसात 1000 रुपयांनी वाढलं सोनं; जळगावच्या सुवर्ण बाजारातून आली मोठी बातमी

एका दिवसात 1000 रुपयांनी वाढलं सोनं; जळगावच्या सुवर्ण बाजारातून आली मोठी बातमी

सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली, ज्याचा परिणाम पुन्हा सोन्याच्या दरावर (gold rate) झाला आहे.

जळगाव, 15 सप्टेंबर ः अनलॉक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या सोन्याच्या भावात (Gold rate) घसरण झाली होती. सोन्याच्या भावात घसरण झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून सोन्याचा भाव स्थिरावला होता. मात्र आता सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये वाढ झाली आणि याचा परिणाम पुन्हा सोन्याच्या दरावर पाहायला मिळतो आहे. जळगाव सुवर्णनगरीत (jalgaon gold) सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ झाली. एका दिवसातच सोनं तब्बल हजार रुपयांनी वाढलं आहे. जळगावमध्ये आज सोन्याचा दर प्रतितोळा 52 हजारांवर पोहोचला आहे. तर सोन्यापाठोपाठ चांदीही चार हजार रुपयांची वाढली आहे. चांगी 63,000 प्रति किलो झाली आहे. लॉकडाऊनमुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. कोरोना महासाथीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली. परिणामी लॉकडाऊन काळात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र अनेक देशांमध्ये लॉकडाऊन हळूहळू शिथील करण्यात आला. शिवाय रशियामधून कोरोना लसीची बातमी मिळाली आणि सोन्याचे भाव तब्बल 10 हजारांनी घसरून स्थिरावले होते. मात्र ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी वाढल्याने सोन्याच्या दर पुन्हा वाढू लागले आहेत. दिल्लीत सोन्याच्या किमतीत प्रतितोळा 422 रुपयांनी वाढ मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 422 रुपयांनी वाढली आहे. यामुळे सोन्याचे दर 53,019 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. दरम्यान चांदीचे भाव (Silver Price Today) 1,013 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. हे वाचा - Castrol Activ ने #ProtectIndiasEngine या कॅम्पेनच्या निमित्ताने नवा मापदंड याआधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर 52,597 रुपये प्रति तोळावर  बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव वाढले आहेत. याठिकाणी सोन्याचे दर 1,963 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. सोन्याचांदीचे भाव वाढण्याचे कारण एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते रुपयामध्ये घसरण झाली आहे. ज्यामुळे या मौल्यवान धातूच्या किमती वाढल्या आहेत. हे वाचा - ऑक्टोबरआधी Flipkart देणार 70000 लोकांना नोकरी, कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही तज्ज्ञांच्या मते सध्याच्या स्तरावरून अधिक तेजीने सोन्याचे भाव वाढतील याची शक्यता कमी आहे.  कारण जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) लशीसंदर्भात अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात सोन्याच्या किंमती कमी होऊ शकतात.
Published by:Priya Lad
First published:

पुढील बातम्या