सोन्याचे दर जाणार 40 हजाराच्या पुढे, पैसे कमवण्याची तुमच्याकडे उत्तम संधी

सोन्याचे दर जाणार 40 हजाराच्या पुढे, पैसे कमवण्याची तुमच्याकडे उत्तम संधी

Gold, Investment - सोनं वधारतंय. सोन्यात गुंतवणूक करून कसा फायदा होतो ते पाहा

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : सोन्याची खरेदी ही भारतीयांची पहिली पसंती असते. आता तर जगभरातले लोक सोनं खरेदी करतायत. म्हणूनच सोन्याच्या किमतींनी शिखर गाठलंय. दिल्ली सराफा बाजारात पहिल्यांदा 10 ग्रॅम सोन्याची किंमत 38,000च्या पुढे पोचलीय. तज्ज्ञांच्या मते अमेरिका-चीनच्या व्यापार युद्धाचा हा परिणाम आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला सुस्ती आलीय. म्हणूनच शेअर मार्केट कोसळतंय. म्हणूनच सोन्यात गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातंय.

सोन्याच्या किमतीत होऊ शकते वृद्धी

केडिया कमोडिटीचे अजय केडिया म्हणाले, सोन्याच्या किमती कमी होण्याची काही लक्षणं दिसत नाहीत. पुढच्या काही महिन्यात सोन्याची किंमत 41,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होऊ शकते.

सोनं का वधारतंय?

1. जागतिक राजकीय संकट अनिश्चित आहे.

2. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढलीय.

3. सेंट्रल बँका सारख्या सोन्याची खरेदी करतायत.

4. शेअर बाजार सतत पडत असल्यानं गुंतवणूकदारांचा कल सोनं खरेदीकडे वाढतोय.

घर खरेदी करताय? मग म्युच्युअल फंडाची 'अशी' घ्या मदत आणि राहा टेंशन फ्री

सोन्यातली गुंतवणूक उत्तम

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे सध्याच्या काळात सोन्यात गुंतवणूक केली की चांगले रिटर्न मिळू शकतात. जानेवारीत सोन्यात गुंतवणूक केली असती तर आता 10 टक्के रिटर्न मिळाले असते. तेच शेअर बाजारात 5 टक्के रिटर्न मिळतायत.

बँकेत एफडीमध्ये गुंतवणूक केलीत तर 6.5 टक्के रिटर्न मिळतात. म्युच्युअल फंडाचंही अनिश्चित असतं. कधी त्यातले पैसे कमीही होतात. त्यामुळे सोन्यातली गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर समजली जाते.

पेट्रोलच्या दरात बदल नाही, डिझेल आणखी स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

सोनं खरेदी बाँडमध्ये केली तर फायदेशीर

सध्या गोल्ड ईटीएफ किंवा बाँडरूपी सोनं खरेदी करण्याचा ट्रेंडही वाढतोय. यामुळे सोनं चोरी होण्याची शक्यता राहात नाही.

जाणून घेऊ या मोदी सरकारच्या गोल्ड बाॅण्ड स्कीमबद्दल -

1. ही स्कीम काय आहे? - साॅवरेन गोल्ड बाॅण्डची सुरुवात नोव्हेंबर 2015मध्ये झाली. यात तुम्ही सोनं खरेदी करून ठेवण्यापेक्षा साॅवरेन बाॅण्डमध्ये गुंतवणूक केली, तर तुमचा करही वाचतो.

2. कशी खरेदी करायची गोल्ड बाॅण्ड स्कीम? - या बाॅण्डची विक्री बँका, स्टाॅक होल्डिंग काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ठराविक पोस्ट ऑफिस आणि एनएसई म्हणजे बीएसईद्वारे होईल.

SBI नंतर आता 'या' 3 बँकांनी कमी केले व्याज दर, 'इतका' द्यावा लागेल EMI

मिळतात हे 4 फायदे

1. ऑनलाइन पेमेंटवर जादा सवलत - अर्थमंत्रालयानं सांगितलं की भारत सरकारनं आरबीआयच्या सल्ल्यानं ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केलं तर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट दिलीय.

2. 2.5 टक्के वर्षाला व्याज - या योजनेअंतर्गत इनिशियल इन्व्हेस्टमेंटवर 2.5 टक्के वर्षाला व्याज मिळेल.

3. भांडवली उत्पन्न करातही होऊ शकते बचत - बाॅण्डची किंमत सोन्याच्या किमतीतल्या अस्थिरतेवर अवलंबून असते. सोन्याच्या किमतीत होणाऱ्या घसरणीमुळे गोल्ड बाॅण्डवर नकारात्मक रिटर्न मिळतात. या अस्थिरतेला कमी करण्यासाठी सरकार दीर्घ काळाचे गोल्ड बाॅण्ड जारी करते. याच्या गुंतवणुकीचा काळ 8 वर्ष असतो. पण तुम्ही 5 वर्षांनी तुमचे पैसे काढून घेऊ शकता. 5 वर्षानंतर पैसे काढल्यानंतर भांडवली उत्पन्न कर लावला जात नाही.

4. कर्ज मिळू शकतं -  गोल्ड बाॅण्ड पेपर कर्जासाठी वापरता येतो. हा पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटप्रमाणे असतो.

मात्र भारतीयांचा कल सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे असतो. सोनं खरेदी करताना हाॅलमार्क पाहून खरेदी करावं. प्रत्येक कॅरेटचा नंबर वेगळा असतो.

कॅरेट आणि नंबर

23 कॅरेटचा नंबर 958

22 कॅरेटचा नंबर 916

21 कॅरेटचा नंबर 875

18 कॅरेटचा नंबर 750

14 कॅरेटचा नंबर 585

9 कॅरेटचा नंबर 375

घर की तलाव कळेना, कोल्हापुरातल्या गावातील पुराची भीषणता दाखवणारा ग्राऊंड REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Aug 10, 2019 01:31 PM IST

ताज्या बातम्या