पाकिस्तानात हाहाकार! भारताच्या दुप्पट किमतीत विकलं जातंय सोनं

पाकिस्तानात हाहाकार! भारताच्या दुप्पट किमतीत विकलं जातंय सोनं

Gold Price, Pakistan - पाकिस्तानात सोन्याचे दर गगनाला भिडलेत. त्यात महागाईही प्रचंड आहे

  • Share this:

मुंबई, 08 ऑगस्ट : कुठल्याही देशात सर्वसामान्य नागरिकांसाठी महागाईला तोंड देणं भयंकर असतं. ही महागाई व्हेनेझुएला आणि झिम्बाब्वेसारख्या देशांत हजार टक्क्यांवर गेली तर मग अर्थव्यवस्था कोलमडलीच. आणि एखादा देश कर्जात पूर्ण बुडाला असेल तर महागाईचा कडेलोटच म्हणायचा. सध्या हीच परिस्थिती आहे पाकिस्तानची. पंतप्रधान इम्रान खान हताश झालेत. पाकिस्तानात पेट्रोल डिझेलनंतर सोन्याची भावही प्रचंड वाढलाय. शुक्रवारी सोन्याची किंमत 1750 पाकिस्तानी रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय.

भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये सोनं दुप्पट

10 ग्रॅम सोन्याची किंमत भारतात 37920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पाकिस्तानात सोन्याची किंमत 86,250 पाकिस्तानी रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. भारताच्या तुलनेत ही दुप्पट आहे.

खूशखबर, आज पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

पाकिस्तानात सोनं का महाग?

पाकिस्तानची वेबसाइट डाॅननं म्हटलंय की जगभरात सोन्याची किंमत वाढण्याचा परिणाम पाकिस्तानवर झालाय.

ऑल इंडिया सर्राफा ज्वेलर्स असोसिएशन (ASSJA)चं म्हणणं आहे की, 32 डाॅलर प्रति औंस उडी मारत जगभरात सोन्याची किंमत 1,495 डाॅलर प्रति औंस झालीय. पाकिस्तानी रुपया कमजोर झाल्यानं त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर पडलाय.

मोठी बातमी ! आता 4 तास आधीच विमानतळावर पोहोचावंच लागेल कारण ...

काल (7ऑगस्ट) भारतात दिल्लीत सोनं 1,113 रुपयांनी महागलंय. आता ते 37,920 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं. तर चांदीही 650 रुपयांनी वधारलीय. चांदी आता 43,670 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूयाॅर्कमध्ये सोन्याची किंमत 1,487.20 डाॅलर प्रति औंस झाली, तर चांदी 16.81 डाॅलर प्रति औंस आहे.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत मिळतात बँकेपेक्षा जास्त पैसे, अशी करा गुंतवणूक

दिल्लीत 99.9 टक्के सोनं 1,113 रुपयांनी वाढून 37,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 37,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गिन्नी सोन्याची किंमत 200 रुपयांनी वाढून 27,800 रुपये प्रति 8 ग्रॅम राहिलीय.

आईने प्राण सोडले पण लेकरू सोडलं नाही, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Aug 8, 2019 04:55 PM IST

ताज्या बातम्या