मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price: आठवभरात सोन्याच्या दरात वाढ, सोनं किती रुपयांनी महागलं? चेक करा लेटेस्ट दर

Gold Price: आठवभरात सोन्याच्या दरात वाढ, सोनं किती रुपयांनी महागलं? चेक करा लेटेस्ट दर

Gold Price Update: गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोने प्रति 10 ग्रॅम 341 रुपयांनी महागले आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली होती.

Gold Price Update: गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोने प्रति 10 ग्रॅम 341 रुपयांनी महागले आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली होती.

Gold Price Update: गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोने प्रति 10 ग्रॅम 341 रुपयांनी महागले आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली होती.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 14 ऑगस्ट : सोन्याच्या दरात या आठवड्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोने थोडे महाग झाले असून ते 52 हजार प्रति 10 ग्रॅमच्या वर आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव 52 हजार रुपयांच्या खाली आला होता. शुक्रवारी 12 ऑगस्ट या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 52,481 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. तर गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचा दर 52,140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट 2022 मध्येही सोन्याचा दर 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोने प्रति 10 ग्रॅम 341 रुपयांनी महागले आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर सोन्याचा दर सुधारला आणि तो 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला. सरकारकडून विवाहित जोडप्यांना मिळतात 72000 रुपये, तुम्हीही घेऊ शकता लाभ
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, सोमवारी 8 ऑगस्ट रोजी सोने 51,968 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. बुधवारी दर वाढला आणि तो 52,297 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला. सोन्याचा दर गुरुवारी 52,224 रुपये आणि शुक्रवारी 52,481 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.
24 कॅरेट सोन्याचा भाव सर्वाधिक 52,481 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,271 रुपये होता. सर्व प्रकारच्या सोन्याचे दर कर न लावता मोजले गेले आहेत. सोन्यावरील जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात. सोन्याचे दागिने खरेदी केल्यास त्यावर करानंतर मेकिंग चार्जही आकारला जातो. त्यामुळे भाव वाढतो. बँकेच्या वसुली एजंट्सना लगाम लावण्यासाठी RBI चे कडक नियम, एजंट्स कोणत्या वेळेत फोन करु शकतात? कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

पुढील बातम्या