7 वर्षांनंतर पुन्हा सोन्यानं गाठला उच्चांक, जाणून घ्या आजचे दर

7 वर्षांनंतर पुन्हा सोन्यानं गाठला उच्चांक, जाणून घ्या आजचे दर

2020 च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती 1,800 डॉलर प्रति औंस म्हणजेच साधारण 50,000 ते 55,000 प्रति तोळापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वेगानं वाढत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक व्यापार व्यवसाय ठप्प झाले आहेत. आर्थिक मंदीचं सावट असतानाच सोन्या-चांदीला मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात झळाळी आलेली पाहायला मिळत आहे. 7 वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरानं आज उच्चांक गाठला आहे. सोमवारी घरेलू वायदा बाजारात सोन्याचे दर 46 हजार 600 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 43 हजार 500 रुपये किलो असा होता.

गेल्या महिन्यात जगभरातील इक्विटी बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. महिन्याभरापूर्वी सोन्याचे वायदा प्रति औंस 1,400 डॉलरच्या आसपास होता, जो आता प्रति औंस 18,00 डॉलर झाला आहे. भारतात सोन्याची किंमत 2 टक्क्यांनी वाढल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी भारतीय कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज बाजार बंद राहिला. एमसीएक्सवरील वायदा आज 1.3% वाढून MC 44,350 प्रति किलो झाला आहे.

हे वाचा-लॉकडाऊनसाठी नवी नियमावली जाहीर; 'या' सेवांना दिल्या सवलती, तर ट्रेन बंदच राहणार

2020 च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती 1,800 डॉलर प्रति औंस म्हणजेच साधारण 50,000 ते 55,000 प्रति तोळापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारी अस्थिरता, अर्थव्यवस्थेबाबत असणारी भीती या सर्व कारणांमुळे सोन्याच्या पुढील 2-3 वर्षांत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत 2020 या वर्षात सोन्याच्या किंमतीमध्ये 6,794 रुपयांची म्हणजेच 17.31 रुपयांची वाढ झाली आहे. 2020 या वर्षामध्ये सोन्यामधून 15.19 इतका रिटर्न मिळाला आहे. मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे (PNG Jewellers) मॅनेजिंग डिरेक्टर डॉ. सौरभ गाडगीळ यांनी systematic investment plan (SIP) या पद्धतीने सोनेखरेदी करण्यासंदर्भात सुचवले आहे. रुपये 41,000 मध्ये गुंतवणूक करणे चांगली सुरूवात ठरू शकते, असही ते म्हणाले.

हे वाचा-सर्व दावे कोरोनापुढे फेल, उष्ण प्रदेशांमध्ये अधिक वेगाने वाढतोय प्रादुर्भाव

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 15, 2020, 10:53 AM IST

ताज्या बातम्या