मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीत घसरण; वाचा पुढे काय असतील गोल्ड रेट

Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीत घसरण; वाचा पुढे काय असतील गोल्ड रेट

सध्या मागील वर्षीच्या सर्वात उच्चांकी दरापासून आजचा दर 9223 रुपयांनी कमी आहे.

सध्या मागील वर्षीच्या सर्वात उच्चांकी दरापासून आजचा दर 9223 रुपयांनी कमी आहे.

सध्या मागील वर्षीच्या सर्वात उच्चांकी दरापासून आजचा दर 9223 रुपयांनी कमी आहे.

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोने दरात (Gold Price Today) काहीशी वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोन्याचा वायदे भाव 0.08 टक्के म्हणजेच 37 रुपयांनी वाढून तो 46,977 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीचा भाव (Silver Price Today) काहीसा कमी झाला आहे. चांदीच्या दरात 0.09 टक्के म्हणजेच 56 रुपयांची घसरण झाली असून 63182 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

सोन्याचा दर मागील वर्षी सर्वात उच्चांकी स्तर 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. सध्या मागील वर्षीच्या सर्वात उच्चांकी दरापासून आजचा दर 9223 रुपयांनी कमी आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या डेल्टा वेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांमुळे आर्थिक बाबींवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. मागील एका आठवड्यापासून सोन्याच्या दरात जवळपास 950 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरातही जवळपास 4100 रुपयांची घसरण झाली आहे.

डेल्टा वेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांबाबत व्यापारी आणि गुंतवणुकदारांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण आहे. जागतिक बाजारात रुपयांत होणाऱ्या चढ-उताराचा परिणाम सोन्याचा किमतीवरही होऊ शकतो. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शुद्ध सोन्याचा भाव 46,702 रुपये 10 ग्रॅम इतका होता. तर चांदी 62,612 रुपये प्रति किलोग्रॅम होता.

Aadhaar मध्ये अ‍ॅड्रेस अपडेट करण्यासाठी नियमांत बदल, UIDAI ने सांगितला नवा नियम

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

1947मध्ये 88 रुपये होतं सोनं, आजपर्यंत सोन्याने दिला 52000% चा रिटर्न

अशी तपासा सोन्याची शुद्धता -

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.

First published:
top videos

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today