नवी दिल्ली, 3 मार्च : देशांतर्गत बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मुल्य घसरल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची किंमत वाढली आहे. गेल्या आठवड्यातील 3 दिवसांंमध्ये सोन्याचे दर 1000 रुपयांनी कमी झाले होते. पण त्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी सोन्याचे दर (Gold Prices Today) काहीसे वाढलेले पाहायला मिळाले. दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत 6 रुपयांनी वाढली आहे. मात्र सोमवारी वधारलेली चांदी मात्र उतरली आहे. आज चांदीच्या दरात (Silver Prices Today) घट झालेली पाहायला मिळाली. प्रति किलो चांदीची किंमत 58 रुपयांनी कमी झाली आहे. सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत 391 रुपयांनी वाढली होती तर प्रति किलो चांदीची किंमत 713 रुपयांनी वाढ झाली होती.
सोन्याचा नवा दर
राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा दर 6 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रति तोळा सोन्याचे 42 हजार 958 रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1 हजार 604 डॉलर प्रति औंसवरून 1 हजार 595 प्रति औंसपर्यंत कमी झाला आहे.
चांदीचा नवा दर
मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा चांदीची किंमत 58 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे प्रति किलो चांदीची किंमत 46 हजार 271 रुपयांवरून 46 हजार 213 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर घसरून ते 17 डॉलर प्रति औंसवरून 16.76 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.
सोन्याचे दर वाढण्याची शक्यता
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणतात की, ‘रुपयाच्या घसरणीनंतर सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा होती. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतीत घट झाल्यामुळे किंमती वाढणं काही काळासाठी थांबलं आहे. पण येत्या काही दिवसांत अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिजर्व्हचा व्याज दर कमी झाल्यास सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.’
अन्य बातम्या
कोरोनाचा धोका वाढला ! भारतात एकूण 6 रुग्ण, आणखी 6 जणांना व्हायरस झाल्याची शक्यता
आयकर विभागाकडून अलर्ट! पॅन-आधार लिंक न केल्यास भरावा लागणार 10 हजारांचा दंड
नोकरदार वर्गासाठी खूशखबर! PF संदर्भात 5 मार्चला सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय