मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ; तरीही सोनं उच्चांकी किमतीपेक्षा 3700 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ; तरीही सोनं उच्चांकी किमतीपेक्षा 3700 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today:  सोनं आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 3,719 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 12 ऑगस्ट : सोन्याच्या दरातील चढ-उतार सुरुच आहे. सोन्याच्या दरात काल घसरण झाली होता. मात्र आज सोनं महागलं आहे. सोनं आज 52481 रुपये प्रति तोळे दराने विकलं जात आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 52481 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 52460 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 21 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला आहे. सोनं आजही उच्चांकी किमतीपेक्षा स्वस्त मात्र सोनं आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 3,719 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. बँकेत FD करण्याआधी RBIने बदललेले नियम जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान कॅरेटनुसार सोन्याचे आजचे दर 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 52481 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी आज 52271 रुपये मोजावे लागत आहेत. 21 कॅरेट शुद्धतेचं सोनं 48073 रुपयांनी विकलं जात आहे. तर 18 आणि 14 कॅरेटचा भाव अनुक्रमे 39361 रुपये आणि 30701 रुपये आहे. भाड्याच्या घरावरही GST? नवीन नियमानुसार 'या' भाडेकरुंना भरावा लागणार 18 टक्के टॅक्स
चांदीच्या दरात घसरण
आज चांदीचा दर 58490 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 58700 प्रति किलोवर बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर प्रतिकिलो 210 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे. कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

पुढील बातम्या