• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: सोनं गाठणार 60000 रुपयांचा टप्पा, एका आठवड्यात 410 रुपयांनी वधारले दर

Gold Price Today: सोनं गाठणार 60000 रुपयांचा टप्पा, एका आठवड्यात 410 रुपयांनी वधारले दर

Gold price today: गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात 410 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचे दर 123 रुपयांनी वधारले आहेत. 9 जुलै रोजी सोन्याचे दर 47863 रुपये प्रति तोळा होते, तर शुक्रवारी बाजार बंद होत असताना सोन्याचे दर 48273 रुपये प्रति तोळा होते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 जुलै: गेल्या आठवडाभरात सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) बराच चढउतार पाहायला मिळाला आहे. या दरम्यान सोन्याच्या दरात (Gold Rates) जवळपास 410 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचे दर (Silver Price Today) देखील 123 रुपयांनी वधारले आहेत. सराफा बाजारात सोन्याचे दर 48273 रुपये प्रति तोळा आहेत तर चांदीचे दर (Silver Rates) 68912 रुपये प्रति किलो आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) च्या मते, 9 जुलै रोजी सोन्याचे दर 47863 रुपये प्रति तोळा होते, तर शुक्रवारी बाजार बंद होत असताना सोन्याचे दर 48273 रुपये प्रति तोळा होते. या हिशोबाने सोन्याच्या दरात 410 रुपयांची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन मार्केटने केलं आहे हे ट्वीट इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशनची वेबसाइटच्या मते 16 जुलै रोजी शुद्ध सोन्याचे (999) दर 4827 रुपये, 22 कॅरेटचा दर 4663 रुपये, 18 कॅरेटचा दर 3862 रुपये प्रति 1 ग्रॅम आहे. IBJA द्वारे जारी केले जाणारे दर हे देशभरात सर्वमान्य असतात. दरम्यान या दरांमध्ये जीएसटी समाविष्ट करण्यात आलेला नाही. हे वाचा-इंधनाचे दर सामान्यांना न परवडणारेच! या शहरांमध्ये पेट्रोलचे दर 113 रुपयांवर मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. हे वाचा-SBI ग्राहकांसाठी आवश्यक बातमी! तुम्ही YONO APP वापरता का? होणार महत्त्वाचे बदल काय आहे तज्ज्ञांचं मत जाणकारांच्या मते, या वर्षअखेरपर्यंत सोन्याचे दर रेकॉर्ड तोडून 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकतात. अशावेळी गुंतवणुकदार चांगला फायदा कमावू शकतात. सोन्यामधील गुंतवणुकीबाबत बोलायचं झालं तर गेल्यावर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला आहे. तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सध्या सोनंखरेदीसाठी उत्तम वेळ आहे आणि सोनं हा एक चांगला पर्याय देखील आहे, ज्यामध्ये चांगला रिटर्न मिळेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: