Home /News /money /

Gold Price Today : या महिन्यात 5500 रुपयांनी उतरले सोने, वाचा काय आहेत नवे दर

Gold Price Today : या महिन्यात 5500 रुपयांनी उतरले सोने, वाचा काय आहेत नवे दर

ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळा या रेकॉर्ड स्तरावर पोहोचले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये रेकॉर्ड स्तराने घसरण झाली. सोन्याचे दर 5500 रुपयांपर्यंत या महिन्यात कमी झाले आहेत. सोन्याचे दर 51 हजाराच्या घरात आहेत. दरम्यान आज सोन्याचे भाव वाढले आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरची मागणी वाढल्यामुळे जगभरातील सोन्याच्या किंमती सातत्याने कमी होत आहेत. मात्र मंगळवारी विदेशी बाजारात वाढलेल्या खरेदीमुळे सोन्याच्या किंमतीत तेजी आली आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) 663 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. तर चांदीमध्ये देखील 1321 रुपयांची तेजी आली आहे. तज्ज्ञांच्या मते विदेशी बाजारांप्रमाणेच देशांतर्गत बाजारातही तेजी पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांच्या नजरा अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये होणाऱ्या वादविवादांवर आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकन सरकार कडून जाहीर करण्यात येणाऱ्या आर्थिक पॅकेजकडे देखील गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत. सोन्याचे नवे दर (Gold Price on 29th September 2020) एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर  663 रुपये प्रति तोळाने वाढून 51,367 रुपये प्रति तोळा झाले आहेत सोमवारी याठिकाणी सोन्याचे दर 50,704 रुपये प्रति तोळावर स्थीर झाले होते. चांदीचे नवे दर (Silver Price on 29th September 2020) सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीतही तेजी आली आहे. मंगळवारी एक किलो चांदीचे दर 1,321 रुपयांनी वाढले आहेत. यानंतर चांदी 61,919 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. सोमवारी चांदीचे दर 60,598 रुपये प्रति किलोग्रामवर स्थीर झाले होते. पुन्हा का वाढले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांच्या मते, दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 663 रुपयांनी वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे त्याचा परिणा देशांतर्गत बाजारातील किंमतीवर झाला आहे. त्याचप्रमाणे रुपयाचे घसरलेले मुल्य देखील सोन्याच्या किंमतीवर परिणाम करत आहे. (हे वाचा-खरीप पिकाच्या विक्रीनंतर शेतकऱ्यांना त्वरित मिळणार पैसे, सरकारचा मोठा निर्णय) देशांतर्गत वायदे बाजारात सुरुवातीच्या सत्रामध्ये काहीशी तेजी होती. एमसीएक्सवर ऑक्टोबरच्या वायदे किंमतीत 67 रुपये अर्थात 0.13 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर सोन्याचे दर 50,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. सोमवारी सोन्याचे ऑक्टोबरचे वायदा दर 50,133 रुपये प्रति तोळा होते. मंगळवारी एमसीएक्सवर चांदीचे दर 289 रुपयांनी अर्थात 0.48 टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर चांदीचे दर 60,685 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या