• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीच्या दरात वाढ; पाहा नवे दर

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीच्या दरात वाढ; पाहा नवे दर

सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) सोमवारी दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम 8 रुपयांची किंचित घट नोंदवण्यात आली. यासह राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची किंमत 47,004 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचली आहे.

 • Share this:
  मुंबई, 8 नोव्हेंबर : दिवाळी निमित्ती गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात काहीशी तेजी पाहायला मिळत होती. सणासुदीच्या दिवसात अनेकजण सोन्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतात. त्यासोबत आता लग्न समारंभासही सुरुवात होईल. त्यामुळे सोनं खरेदीतही वाढ होते. अशावेळी सोन्याचे सध्या दर काय आहेत हे नियमितपणे लोक तपासत असतात. आज म्हणजेच 8 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याच्या घसरणीनंतरही दर 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहेत. तर आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 47,012 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. तर चांदीचा भाव 63,046 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात फारसा बदल झालेला नाही. सोन्याच्या किंमतीत सोमवारी दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम 8 रुपयांची किंचित घट नोंदवण्यात आली. यासह राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची किंमत 47,004 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचली आहे.

  Petrol-Diesel Price Today: पेट्रोल डिझेलचे आजचे दर काय? वाचा सविस्तर

  चांदीचे आजचे नवे दर सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी आज चांदीच्या दरात वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा भाव 216 रुपयांनी वाढून 63,262 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्याच वेळी, आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 24.19 डॉलर प्रति औंसवर कायम आहे. सोन्याची शुद्धता कशी तपासणार? सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.

  Credit Card चोरीला गेलंय? भुर्दंड टाळण्यासाठी पटकन उचला ही पावलं

  सोन्या-चांदीचे दर घरबसल्या तपासा सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: