• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: 4 दिवसांत तिसऱ्यांदा सोने दरात घसरण, इथे तपासा आजचा गोल्ड रेट

Gold Price Today: 4 दिवसांत तिसऱ्यांदा सोने दरात घसरण, इथे तपासा आजचा गोल्ड रेट

Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today

मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने वायदे (Gold price today) किमतीत 4 दिवसांत तिसऱ्यांदा घसरण झाली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : सोने-चांदी दरात (Gold-Silver) आजही घसरण झाली आहे. कमकुवत जागतिक संकेतांचा परिणाम भारतीय सोने बाजारात पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने वायदे (Gold price today) किमतीत 4 दिवसांत तिसऱ्यांदा घसरण झाली आहे. आज सोनं 0.1 टक्के घसरणीसह 46,860 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रे़ड करत आहे. चांदी (Silver price today) 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह 63,155 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने दरात घसरण पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने दरात घसरणीचं कारण डॉलर आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव - गुड्सरिटर्न वेबसाईटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 50340 रुपये आहे. चेन्नईत 48380 रुपये, मुंबईत 47000 रुपये आणि कोलकातामध्ये 49250 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. MCX वर ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

    पती-पत्नीसाठी जबरदस्त आहे ही सरकारी योजना, दर महिन्याला मिळेल 10000 रुपये पेन्शन

    सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.

    सरकारचा मोठा निर्णय, नोकरी गमावलेल्यांना पुढील जूनपर्यंत मिळणार या स्किमचा फायदा

    सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.
    Published by:Karishma
    First published: